"करेक्ट कार्यक्रमाच्या पुढे एक करेक्ट कार्यक्रम असतो, तो मी देखील करणार", राजू शेट्टींचा राष्ट्रवादीला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 01:58 PM2021-09-04T13:58:35+5:302021-09-04T13:59:01+5:30

Raju Shetti : शेतकऱ्यांना तातडीने पुरेशी मदत देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी राजू शेट्टी यांनी बुधवारी पंचगंगा परिक्रमा यात्रेला सुरुवात केली. यात्रा नरसिंहवाडी येथे पोहोचल्यानंतर जलसमाधी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

swabhimani shetkari sanghatna leader Raju Shetti slams ncp on name has been removed list legislative council | "करेक्ट कार्यक्रमाच्या पुढे एक करेक्ट कार्यक्रम असतो, तो मी देखील करणार", राजू शेट्टींचा राष्ट्रवादीला इशारा

"करेक्ट कार्यक्रमाच्या पुढे एक करेक्ट कार्यक्रम असतो, तो मी देखील करणार", राजू शेट्टींचा राष्ट्रवादीला इशारा

googlenewsNext

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून विधान परिषदेत नियुक्ती करण्यासाठी देण्यात आलेल्या १२ आमदारांच्या यादीबाबत अद्यापही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे प्रलंबित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी राज्यपालांची भेट घेतली असून यासंबंधी पत्रही दिले आहे. यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या यादीतील नावावरून संभ्रम निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शेट्टी यांच्या नावास आक्षेप घेतल्याचे सांगितले जात असून, राष्ट्रवादी काँग्रेसनेराजू शेट्टींचे नाव वगळण्याचा निर्णय घेतल्याचीही एक चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप  राष्ट्रवादीकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, राजू शेट्टी यांनी याबाबत नाराजी जाहीर केली असून करेक्ट कार्यक्रमाच्या पुढे एक करेक्ट कार्यक्रम असतो, तो मी करेन असा इशाराच त्यांनी राष्ट्रवादीला दिला आहे.

शनिवारी राजू शेट्टी यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीचा झालेला एक समझौता होता. तो पाळायचा किंवा धारदार खंजीर खुपसायचा हे राष्ट्रवादीने ठरवायचे आहे. आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही काय त्यांच्या दारात भीक मागायला गेलो नव्हतो. त्यामुळे काही झाले तरी मला आमदार करा, नाहीतर जीव सोडणार असे माझे म्हणणे नाही आहे, असे राजू शेट्टी म्हणाले. याचबरोबर, गेल्या अडीच वर्षांपासून मी कोणत्याच पदावर नाही. त्यामुळे काय लोकांच्या मनातील स्थान कोणी हिरावून घेऊ शकत नाही. करेक्ट कार्यक्रमाच्या पुढे एक करेक्ट कार्यक्रम असतो, तो मी करेन असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.

शेतकऱ्यांना तातडीने पुरेशी मदत देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी राजू शेट्टी यांनी बुधवारी पंचगंगा परिक्रमा यात्रेला सुरुवात केली. यात्रा नरसिंहवाडी येथे पोहोचल्यानंतर जलसमाधी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी आम्हाला ठोस निर्णयाची अपेक्षा असून केंद्राप्रमाणे राज्य सरकारकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. तसेच, राज्य सरकारकडून दुर्लक्ष करण्यात आले तर महागात पडेल. इतक्या उन्हात लोक आमच्यासोबत चालत आहेत ते वेडे आहेत का? असा सवाल केली.

याचबरोबर, ते म्हणाले, "मी विचार केल्याशिवाय कोणता निर्णय घेत नाही. २३ ऑगस्टलाच मी शासनाने महापुरात झालेल्या पिकांच्या नुकसानावर काढलेले कर्ज माफ करावे अशी मागणी सरकारकडे केलो होती. पूराला आता दीड महिना झाला असून नव्या पिकासाठी पैशांची गरज आहे. जुने कर्ज माफ झाल्याशिवाय नवे कर्ज मिळणार नाही. त्यानुसार शेतीचे नियोजन करता येईल,” असे म्हणत राजू शेट्टी यांनी जलसमाधी आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडली.

Web Title: swabhimani shetkari sanghatna leader Raju Shetti slams ncp on name has been removed list legislative council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.