‘राष्ट्रवादी’समवेत ‘स्वाभिमानी’चे मैत्रीपर्व सुरु, राजू शेट्टींना 'आमदारकी'ची लॉटरी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 20:06 IST2020-06-16T19:33:24+5:302020-06-16T20:06:21+5:30

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आमदारकीची ऑफर राजू शेट्टी यांनी स्वीकारली...

Swabhimani's friendship with NCP starts, Raju Shetty among NCP-appointed MLAs | ‘राष्ट्रवादी’समवेत ‘स्वाभिमानी’चे मैत्रीपर्व सुरु, राजू शेट्टींना 'आमदारकी'ची लॉटरी लागणार

‘राष्ट्रवादी’समवेत ‘स्वाभिमानी’चे मैत्रीपर्व सुरु, राजू शेट्टींना 'आमदारकी'ची लॉटरी लागणार

ठळक मुद्देबारामती येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि माजी खासदार शेट्टी यांच्यामध्ये चर्चा

बारामती : राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार म्हणुन लवकरच १२ जणांना राजकीय लॉटरी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातुन माजी खासदार राजु शेट्टी यांना ही राजकीय लॉटरी लागल्याचे मंगळवारी(दि १६) स्पष्ट झाले.
बारामती येथील शरद पवार यांच्या 'गोविंदबाग' या निवासस्थानी याबाबत बैठक पार पडली.यावेळी बैठकीसाठी खासदार सुप्रिया सुळे,शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे,स्वाभिमानी चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र ढवाण उपस्थित होते. माजी खासदार शेट्टी यांनी सहा वर्षांपुर्वी याच निवासस्थानासमोर आंदोलन केले होते.त्याच निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेससमवेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मैत्रीपर्व सुरु झाल्याचे मानले जात आहे.
शेट्टी आता राज्यपाल नियुक्त आमदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.बारामती येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि माजी खासदार शेट्टी यांच्यामध्ये चर्चा झाली.त्यामध्ये शेट्टी यांनी ज्येष्ठ नेते पवार यांचा हा प्रस्ताव मान्य केल्याचे 'स्वाभिमानी' च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
बारामती येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री पवार यांच्या निवास्थानी माजी खासदार शेट्टी यांनी आज अचानक भेट दिली. खुद्द पवार यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर याबाबत माहिती दिली. येथील कृषि विज्ञान केंद्राच्या प्रकल्पांची यावेळी शेट्टी यांनी माहिती घेतली. पवार यांनी शेट्टी यांना स्वता:च्या गाडीतुन फिरवत विविध प्रकल्प दाखवले.
लोकसभा निवडणुकीपासुन शेट्टी यांनी भाजपशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस— काँग्रेससोबत जवळीक साधली आहे. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला चार जागा मिळणार आहेत.या कोट्यातुन शेट्टी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.


याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेंद्र ढवाण यांनी 'लोेकमत'शी बोलताना सांगितले कि,ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी खासदार राजु शेट्टी यांच्यातील आज नियोजित बैठक होती.त्यासाठी आज 'पवारसाहेबां'नी चार तास वेळ  दिला. राज्यपाल नियुक्त विधानपरीषद  आमदारांमध्ये खासदार शेट्टी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे ढवाण यांनी सांगितले.
————————————
...साहेबांच्या राजु शेट्टींसाठी 'आमरसा'चा बेत
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माजी खासदार राजु शेट्टी यांना चार तासांपेक्षा अधिक वेळ दिला.यावेळी बारामती (माळेगांव) येथील 'गोविंदबाग' निवासस्थानी शेट्टी यांच्यासाठी आमरसाचा बेत होता.दुपारी जेवणामध्ये आमरसाबरोबरच वांग्याचे भरीत,भाजी,बटाट्याची भाजी,भातासह फोडणीचे वरण,चटणी,लोणचे,ठेचा,भाकरी आणि चपाती आदी पदार्थांचा समावेश होता.
——————————————————

Web Title: Swabhimani's friendship with NCP starts, Raju Shetty among NCP-appointed MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.