साईबाबांच्या देवत्त्वावर आक्षेप घेणारे स्वामी शिर्डीला
By admin | Published: July 3, 2016 02:14 AM2016-07-03T02:14:46+5:302016-07-03T02:14:46+5:30
साईबाबांच्या देवत्त्वावर आक्षेप घेणाऱ्या स्वामी गोविदानंद सरस्वती (दंडीस्वामी) यांनी शनिवारी दुपारी शिर्डीकडे प्रस्थान केले. त्यामुळे पोलिसांवरील ताण वाढला असून स्वामींवर
अहमदनगर : साईबाबांच्या देवत्त्वावर आक्षेप घेणाऱ्या स्वामी गोविदानंद सरस्वती (दंडीस्वामी) यांनी शनिवारी दुपारी शिर्डीकडे प्रस्थान केले. त्यामुळे पोलिसांवरील ताण वाढला असून स्वामींवर पोलिसांची करडी नजर आहे.
शिर्डीला पायी निघालेल्या स्वामींना पोलिसांनी ताब्यात घेऊन वाहनातून कोल्हार भगवतीपूर (ता. राहाता) येथे सोडले. मात्र त्यांनी शिर्डीला जाण्याचा हट्ट सोडला नाही. साईबाबांच्या देवत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांचे स्वामी गोविंदानंद सरस्वती हे शिष्य आहेत. साईबाबांना देवत्त्व का बहाल केले? याचा जाब विचारण्यासाठी शिर्डी देवस्थानच्या विश्वस्तांना भेटण्यासाठी जात असल्याचे स्वामी गोविंदानंद यांनी सांगितले. तुमच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे शिर्डीला जाऊ नये, अशी विनवणी पोलीस अधिकारी त्यांना करीत होते. पोलिसांनी स्वामींना ताब्यात घेऊन पोलीस वाहनामधून सायंकाळी कोल्हार भगवतीपूर येथे पोहचविले. तेथे ते मुक्काम करणार आहेत. रविवारी शिर्डीला जाण्याचा स्वामींनी निर्धार केला आहे. (प्रतिनिधी)