दारूबंदीसाठी ‘स्वामिनीं’चा आंदोलनाचा इशारा!

By admin | Published: July 17, 2015 12:16 AM2015-07-17T00:16:43+5:302015-07-17T00:16:43+5:30

यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी व्हावी म्हणून स्वामिनी जिल्हा दारूबंदी अभियान संघटनेने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दारूबंदीच्या मागणीसाठी यवतमाळच्या

'Swaminarayan agitation' for pistol! | दारूबंदीसाठी ‘स्वामिनीं’चा आंदोलनाचा इशारा!

दारूबंदीसाठी ‘स्वामिनीं’चा आंदोलनाचा इशारा!

Next

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी व्हावी म्हणून स्वामिनी जिल्हा दारूबंदी अभियान संघटनेने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दारूबंदीच्या मागणीसाठी यवतमाळच्या शेकडो महिलांनी गुरुवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय घेतल्यानंतरही चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील ६ तालुक्यांत अद्याप दारूविक्री सुरूच असल्याचे अभियानाचे संयोजक महेश पवार यांनी सांगितले. आदिवासी आणि भटक्या विमुक्तांचा जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख आहे. त्यात नापीकीमुळे व्यसनाच्या आहारी जाऊन २००६ ते २०१५ दरम्यान येथील ३ हजार २२५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करण्याची मागणी महिला वर्गाकडून केली जात आहे. यवतमाळमध्ये दारूबंदी व्हावी, म्हणून येथील हजारो महिलांनी एकत्र येत नऊ वेळा मोर्चे काढले. धक्कादायक बाब म्हणजे दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या येथील यावली गावचे पोलीस पाटील विरेंद्र राठोड यांची निर्घृण हत्या करण्यात आली. इतके होऊनही वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दारूबंदी करण्याचे केवळ आश्वासनच दिले. कोणतीही कारवाई होत नसल्याने प्रथमच महिलांनी मुंबईतील आझाद मैदानात धडक मोर्चा काढला आहे.

Web Title: 'Swaminarayan agitation' for pistol!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.