स्वदेशी वस्तूंच्या खरेदीसाठी झुंबड
By admin | Published: July 22, 2016 01:42 AM2016-07-22T01:42:44+5:302016-07-22T01:42:44+5:30
सानपाडा येथील जयपुरीयार शाळेच्या मैदानावर हस्तकला व हातमागाच्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
नवी मुंबई : सानपाडा येथील जयपुरीयार शाळेच्या मैदानावर हस्तकला व हातमागाच्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. भारताच्या विविध प्रांतातील कारागिरांनी तयार केलेल्या वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असून ग्राहकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. २४ जुलैपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.
एकाच छताखाली सर्व प्रकारच्या घरगुती वापरासाठीच्या वस्तू खरेदी करता येत असल्याने ग्राहकांना खरेदीची चांगली संधी मिळाली आहे. या प्रदर्शनात खुर्जा टेरीकोटा, सहानपूर फर्निचर, भदोई कारपेट, कोलकातामधील कारागिरांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, चंदेरी साडी, जयपुरी मोजडी आणि महाबळेश्वरची चप्पल खरेदी करण्याची संधी याठिकाणी मिळणार आहे. महिलांना याठिकाणी कपडे, दागिन्यांचीही खरेदी करता येणार
आहे.