थंडीच्या कडाक्यात आदिवासी विद्यार्थ्यांना स्वेटरची ऊब

By admin | Published: November 16, 2016 08:55 AM2016-11-16T08:55:18+5:302016-11-16T08:55:18+5:30

आदिवासी विद्यार्थ्यांना नव्या ऊबदार स्वेटरचे दान फाऊंडेशनतर्फे मोफत वाटप करण्यात आले. ऐन थंडीच्या कडाक्यातच ऊब मिळाल्याचा आनंद आदिवासी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहत होता.

Sweatful boredom for tribal students in the cold winter season | थंडीच्या कडाक्यात आदिवासी विद्यार्थ्यांना स्वेटरची ऊब

थंडीच्या कडाक्यात आदिवासी विद्यार्थ्यांना स्वेटरची ऊब

Next

ऑनलाइन लोकमत 

पेठ, दि. १६ - बालदिनाचे औचित्य साधत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल परिसरातील तोरंगण (ह.), हरसूल, वायघोळपाडा, सारस्ते, जातेगाव, दलपतपूर, निरगुडे, चिंचवड, सापतपाली, चिखलपाडा, हट्टीपाडा येथील इयत्ता पहिली ते तिसरी पर्यंतच्या ५०० आदिवासी विद्यार्थ्यांना नव्या ऊबदार स्वेटरचे दान फाऊंडेशनतर्फे मोफत वाटप करण्यात आले. ऐन थंडीच्या कडाक्यातच ऊब मिळाल्याचा आनंद आदिवासी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहत होता.

विशेष म्हणजे हरसूल परिसरातील जवळपास सर्वच खेड्या-पाड्यावर दान फौंडेशनतर्फे कपड्यांचे वाटप करण्यात आले आहे. शिवाय अलिकडेच शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या, पाटी, पेन, पेन्सिल देखील देऊन आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक हातभार लावला होता. अलिकडे वाढत असलेल्या थंडीच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो व परिणामी शालेय पटावर देखील याचा मोठा विपरीत परिणाम होत असतो.

या सर्व पार्श्वभूमीवर शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी दान फौंडेशनचे शर्मा व नीलेश शर्मा यांच्या संकल्पनेतून परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत ऊबदार स्वेटर उपलब्ध करून दिले. तर पुढील काळात उर्वरित विद्यार्थी व जनसामान्यांना श्वेटर उबलब्ध करून देणार असल्याचा मानस व्यक्त केला.

हरसूल येथील स्वेटर वाटप झाल्यानंतर जवळच असलेल्या गडदवणे पाड्यावर आदिवासी महिला, पुरुष व बाल-गोपालांना कपडे वाटप करण्यात आले. यावेळी दान फौंडेशन नाशिक व चक्र धर स्वामी बहुद्देशीय सेवा संस्थेच्या आयोजित कार्यक्रमप्रसंगी शर्मा , मीना शर्मा, हेमलता शर्मा, विजयकुमार शर्मा, अविनाश देव, ज्ञानेश्वर भुजबळ, नितीन सोनवणे यांच्यासोबतच रवींद्र भोये, विनायक माळेकर, डॉ. रघुनाथ भोये, भोसले साहेब , आदींसह परिसरातील शेकडो विद्यार्थी , पालक , शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. दान फौंडेशन नाशिक व चक्र धर स्वामी बहुद्देशीय सेवा संस्थेच्या या समाजसेवी कार्याचे परिसरातून विद्यार्थी- पालक- शिक्षक यांच्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनी कौतुक केले आहे. 

Web Title: Sweatful boredom for tribal students in the cold winter season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.