विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची तडकाफडकी बदली

By Admin | Published: August 13, 2016 03:09 AM2016-08-13T03:09:31+5:302016-08-13T03:09:31+5:30

बदलापूर येथे तब्बल सहा तास चाललेल्या आंदोलनाची दखल थेट दिल्लीत असणाऱ्या रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आली आणि या घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे

The swiftness of departmental railway managers changed | विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची तडकाफडकी बदली

विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची तडकाफडकी बदली

googlenewsNext

मुंबई : बदलापूर येथे तब्बल सहा तास चाललेल्या आंदोलनाची दखल थेट दिल्लीत असणाऱ्या रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आली आणि या घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांची तडकाफडकी बदली केली. ही बदली करतानाच त्याच्या आदेशाची प्रत संध्याकाळपर्यंत मध्य रेल्वेकडे पाठविण्यात आली. ओझा यांनी मध्य रेल्वेवर विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून अठरा महिने काम पाहिले. अमिताभ ओझा यांची बदली दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्रातील गुंटूर रेल्वे विभागात करण्यात आल्याचे समजते.
लोकल वीस मिनिटे उशिराने आल्याने प्रवाशांकडून बदलापूर स्थानकात सकाळच्या सुमारास तब्बल सहा तास उत्स्फुर्त आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांना घटनास्थळी पाठविले आणि प्रवाशांच्या समस्या ऐकूण घेण्याची सूचना केली. मात्र प्रवाशांचा उद्रेक आणि गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मध्य रेल्वे उपनगरीय रेल्वेचा उडणारा बोजवारा पाहता विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात दिल्लीत रेल्वे मंत्री आणि रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर ओझा यांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आला.
ओझा हे इंडियन रेल्वे सर्व्हिसमधील इलेक्ट्रीकल इंजिनियर आहेत. मुंबईतील लोकल हाताळण्यासाठी रेल्वेचा वाहतुक विभागातील अधिकारी हवा, असे म्हणणे मांडत ओझा यांची बदली करण्यात आली. त्याऐवजी ओझा यांच्या जागी बिलासपूर येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक रविंद्र गोयल यांची नियुक्ती करण्याचा निर्णय झाला. ओझा यांची बदली करण्याचे आदेश हे संध्याकाळी पाचच्या दरम्यान मध्य रेल्वे प्रशासनाकडे आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र ओझा यांचा आंदोलनाशी संबंध नसतानाही त्यांच्या झालेल्या बदलीमुळे रेल्वे अधिकाऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)

- अमिताभ ओझा यांनी मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक पदाचा कार्यभार जवळपास अठरा महिने सांभाळला. त्यांच्या कार्यकाळात दिवा येथे गेल्या काही दिवसांपूर्वी प्रवाशांकडून झालेले आंदोलन तसेच हँकॉक पुल तोडल्यानंतर सॅन्डहर्स्ट रोड येथील आंदोलनाबरोबरच आता बदलापूर येथील आंदोलनही झाले.
- मध्य रेल्वेवर येणारे नविन विभागीय रेल्वे व्यवस्थापक रवींद्र गोयल यांना मुंबईतील पश्चिम व मध्य रेल्वेवरील सेवेचाही प्रदीर्घ अनुभव आहे.

Web Title: The swiftness of departmental railway managers changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.