घुमानची साहित्य संमेलनवारी विमानाने!

By admin | Published: November 9, 2014 01:51 AM2014-11-09T01:51:56+5:302014-11-09T01:51:56+5:30

साहित्यप्रेमींना स्वस्तात पुणो ते अमृतसर विमानसेवा उपलब्ध करून देण्याची सूचना पवार यांनी एका खासगी विमानकंपनीच्या मालकाला केली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रंकडून मिळाली आहे.

Swimana literature conclave on airplane! | घुमानची साहित्य संमेलनवारी विमानाने!

घुमानची साहित्य संमेलनवारी विमानाने!

Next
पुणो : घुमान येथे होणा:या 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वेसेवा सुरू करण्याकरिता संमेलन संयोजन समिती रेल्वे प्रशासनाचा  हिरवा कंदिल मिळण्याच्या प्रतिक्षेत असताना विमानसेवेचे दान आणि तेही माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या कृपेने पदरात पडणार असल्याने आयोजकांची स्थिती ‘सातवे आसमान पर’ असल्यासारखी  झाली आहे.  साहित्यप्रेमींना स्वस्तात पुणो ते अमृतसर विमानसेवा उपलब्ध करून देण्याची सूचना पवार यांनी एका खासगी विमानकंपनीच्या मालकाला केली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रंकडून मिळाली आहे.
संगीत-साहित्याची जाण आणि रसिक मनाचे राजकारणी म्हणून ख्याती असलेल्या शरद पवार यांनी नेहमीच साहित्य संमेलनामध्ये रस घेतला आहे. यंदाचे संमेलनही त्याला अपवाद ठरलेले नाही. साहित्य आणि नाटय़ संमेलनाध्यक्षपद सन्मानाने एखाद्या ज्येष्ठ साहित्यिक आणि रंगकर्मींना दिले जावे असे सूतोवाच करून दोन वर्षापूर्वी त्यांनी एक वेगळा विचार मांडला होता.  
शनिवारी  संमेलनाच्या संयोजन समितीची पुण्यात भेट घेऊन त्यांनी संमेलनाच्या आयोजनाची संपूर्ण माहिती जाणून घेतली. इतकेच नव्हे तर संयोजन समितीचे संमेलनाच्या उद्घाटनाला येण्याचे आमंत्रणही त्यांनी स्वीकारले. सुरूवातीला व्यस्त दिनक्रमामुळे वेळ नाही असे म्हणणा:या पवारांनी चक्क अडीच तास संयोजन समितीबरोबर साहित्य मैफल जमवली. 
संमेलनाच्या अनेक आठवणींना उजाळा देत हे संमेलन घुमानमध्ये का घेण्यात येत आहे, यामागील उद्देश जाणून घेतला. घुमानला संत नामदेवांच्या कार्याची पाश्र्वभूमी असल्याने तिथे होणारे संमेलन कोणत्या उंचीचे असावे, ते कशाप्रकारे व्हायला पाहिजे, कार्यक्रम काय असतील याबद्दल समितीच्या पदाधिका:यांशी मनमोकळी करीत त्यांनी काही सूचनाही केल्या.  पंजाबच्या प्रकाशसिंग बादल आणि राज्यपाल शिवराज पाटील यांना तत्काळ दूरध्वनी करून त्यांनी संमेलनाचा आढावाही घेतला. राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे, त्यामुळे पवार यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

 

Web Title: Swimana literature conclave on airplane!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.