स्वाइन फ्लूचे पुन्हा संकट
By admin | Published: July 25, 2015 01:53 AM2015-07-25T01:53:14+5:302015-07-25T01:53:14+5:30
अकोल्यात स्वाइन फ्लूचा संशयित रुग्ण आढळला
अकोला: शहरामध्ये स्वाइन फ्लूसारख्या आजाराचे संकट पुन्हा निर्माण झाले आहे. अकोल्यात स्वाइन फ्लूचा संशयित एक रुग्ण शुक्रवारी आढळून आला असून, रुग्णाला सर्वोपचार रुग्णालयामधील अतिदक्षता कक्षात उपचारार्थ दाखल करण्यात आले. अमरावती जिल्हय़ातील अचलपूर परिसरातील २५ वर्षीय महिला प्रसूतीसाठी सर्वोपचार रुग्णालयात २0 जुलै रोजी दाखल झाली. तिने एका बाळाला जन्मही दिला. परंतु तिची प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांनी तिची तपासणी व काही चाचण्या केल्या असता, तिला स्वाइन फ्लूचा आजार असावा, असा संशय वैद्यकीय अधिकार्यांनी व्यक्त केला. शुक्रवारी महिलेच्या स्नॉबचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. सध्या या महिलेवर सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता कक्षामध्ये उपचार करण्यात येत आहेत. चार ते पाच महिन्यांपूर्वी शहरात स्वाइन फ्लू आजाराने थैमान घातले होते.