राज्यात स्वाइनचे थैमान; १४ बळी

By admin | Published: April 18, 2015 01:53 AM2015-04-18T01:53:02+5:302015-04-18T01:53:02+5:30

राज्यभरात तापमान घटल्याच्या पार्श्वभूमीवर स्वाइन फ्लूचा फैलाव पुन्हा वाढू लागला आहे़ या आजाराने गेल्या २४ तासांत १४ जणांचा बळी घेतला.

Swine state in the state; 14 victims | राज्यात स्वाइनचे थैमान; १४ बळी

राज्यात स्वाइनचे थैमान; १४ बळी

Next

तापमान घटल्याने विषाणू फोफावले
पुणे : राज्यभरात तापमान घटल्याच्या पार्श्वभूमीवर स्वाइन फ्लूचा फैलाव पुन्हा वाढू लागला आहे़ या आजाराने गेल्या २४ तासांत १४ जणांचा बळी घेतला. या वर्षातील बळींची संख्या ४६६ वर पोचली आहे. १ ते १६ एप्रिलदरम्यान राज्यात तब्बल ६२ जणांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे.
गुरुवारी या आजाराने १४ जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये नाशिकमधील चार, नागपूरमधील दोन, पुणे, ठाणे, कोल्हापूर, रत्नागिरी, यवतमाळ, चंद्रपूर, मुंबई आणि मध्य प्रदेश येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. गुरुवारी स्वाइन फ्लूची लागण झालेले आणखी ७ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे रुगणांची संख्या ४,९८० वर पोचली. पैकी ९८ रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)

डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यांमध्ये थंडीमुळे आणि मार्चमध्ये पडलेल्या अवकाळी पावसाने राज्यात स्वाइन फ्लूचा उद्रेक झाला होता आणि अवघ्या तीन महिन्यांत ४०४ जणांचा बळी घेतला होता. एप्रिलमध्ये राज्याचे तापमान वाढल्याने स्वाइन फ्लूचे रुग्ण आणि बळींची संख्या कमी झाली होती. पण गेल्या आठवडाभरापासून राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस पडत आहे. राज्याचे तापमान घटल्याने स्वाइन फ्लूच्या विषाणूंना पोषक वातावरण निर्माण झाले आहे़

Web Title: Swine state in the state; 14 victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.