सिम्बायोसिसचे संचालक सक्तीच्या रजेवर ; ‘मी टू’ च्या वादळाचे सावट 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 08:38 PM2018-10-20T20:38:34+5:302018-10-20T20:42:09+5:30

सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशन (एससीएमसी) या संस्थेतील ‘मीटू’चे वादळ अद्याप शांत झालेले नाही. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून संचालकांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. 

Symbiosis director on compulsory leave; Storm of 'mee Too' | सिम्बायोसिसचे संचालक सक्तीच्या रजेवर ; ‘मी टू’ च्या वादळाचे सावट 

सिम्बायोसिसचे संचालक सक्तीच्या रजेवर ; ‘मी टू’ च्या वादळाचे सावट 

googlenewsNext
ठळक मुद्देअनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आता उघडपणे याबाबतची तक्रार शनिवारी दिवसभर विद्यापीठाच्या अंतर्गत चौकशी समितीसमोर अनुपम सिध्दार्थ यांची चौकशी सुरूचौकशी समितीचा प्राथमिक अहवाल विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे प्राप्त

पुणे : सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशन (एससीएमसी) या संस्थेतील ‘मीटू’चे वादळ अद्याप शांत झालेले नाही. जवळपास शंभरहून अधिक आजी-माजी विद्यार्थ्यांनी संस्थेचे संचालक अनुपम सिध्दार्थ यांना पदावरून हटवून कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यावर सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. 
‘मीटू’ चळवळीच्या माध्यमातून संस्थेतील जवळपास दहा विद्यार्थिनींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लैंगिक शोषण तसेच गैरवर्तनाचा प्रकार समोर आणला होता. त्यानंतर विद्यापीठाने अंतर्गत चौकशी समिती नेमून त्याबाबत चौकशीही सुरू केली. पण गैरवर्तन तसेच मानसिक छळाला सामोरे जावे लागलेल्या अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आता उघडपणे याबाबतची तक्रार केली आहे. सुमारे १०० हून अधिक विद्यार्थिनींनी संस्थेच्या शैक्षणिक व प्रशासन विभागाचे अधिष्ठाता डॉ. भामा वेंकटरमणी यांच्याकडे अनुपम सिध्दार्थ यांच्याविषयी ईमेलद्वारे तक्रार केली आहे. त्यामध्ये २०११ पासूनच्या तुकडीतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. काही विद्यार्थिनींनी त्यात प्रसंगही नमुद केले आहेत. तसेच सिद्धार्थ यांना हटवण्याची मागणी केली आहे. 
संस्थेच्या बंगळुरू येथील आवारातील एक लैंगिक शोषणाचा प्रकारही दडपण्यात आल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. विद्यार्थिनींचे कपड्यांवरील शेरेबाजी, मानसिक त्रास, गैरवर्तनाच्या घटना, प्रशासन, शिस्त याबाबतच्या तक्रारींचाही समावेश आहे. या तक्रारींची विद्यापीठाने गंभीर दखल घेतली आहे. शनिवारी दिवसभर विद्यापीठाच्या अंतर्गत चौकशी समितीसमोर अनुपम सिध्दार्थ यांची चौकशी सुरू होती. 
-----------------
विद्यार्थिनींच्या तक्रारी मिळाल्या आहेत. त्यावरच विद्यापीठाच्या अंतर्गत चौकशी समितीकडून शनिवारी अनुपम सिध्दार्थ यांच्यावरील तक्रारींची चौकशी सुरू होती. या समितीचा प्राथमिक अहवाल विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे प्राप्त झाला आहे. त्यानुसार कुलगुरूंनी त्यांना सखोल चौकशी होईपर्यंत रजेवर पाठविले आहे. 
- डॉ. विद्या येरवडेकर, प्रधान संचालिका, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ 
--------------------

Web Title: Symbiosis director on compulsory leave; Storm of 'mee Too'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.