विरोधकांनी काढली सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा
By admin | Published: March 10, 2016 10:56 AM2016-03-10T10:56:18+5:302016-03-10T11:44:14+5:30
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विरोधकांनी सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली.
Next
ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. १० - कालपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुस-या दिवीश, गुरूवारी विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार निदर्शने करत सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली. गुरुवारी अधिवेशन सुरु होण्याआधीच विरोधकांनी विधानभवनाच्या पाय-यांवर बसून आंदोलन केले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार या आंदोलनात सहभागी झाले.
या प्रतिकात्मक प्रेतयात्रेदरम्यान विरोधकांनी 'राम नाम सत्य है, सरकार बडी मस्त है', 'गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला, घोटाळा घोटाळा युती सरकारचा घोटाळा' अशा घोषणा देत सरकारचा निषेध नोंदवला. शेतक-यांचे प्रश्न, दुष्काळ, राज्य सरकारचा कारभार यावरुनही सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आमदार जयंत पाटील, भाई जगताप, विखे पाटील, अजित पवार या आंदोलनात सहभागी झाले होते.
बुधवारी राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यानदेखील विरोधकांनी घोषणा देत गोंधळ घातला होता. सलग दुस-या दिवशी विरोधकांनी गोंधळ घालत सरकारचा निषेध केला आहे.
Mumbai: Congress and NCP MLAs protest at Maharashtra Assembly against state govt pic.twitter.com/FX5L3ensZh
— ANI (@ANI_news) March 10, 2016