सीरियाच्या तरुणाकडे पुण्याचे सीमकार्ड
By admin | Published: August 6, 2014 11:35 PM2014-08-06T23:35:01+5:302014-08-06T23:35:01+5:30
पुण्यातल्या एका तरुणाच्या नावाने बनावट कागदपत्र सादर करून मोबाईल सीमकार्ड देण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
Next
>पुणो : इंग्रजी विषयाचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यामध्ये आलेल्या तरुणाला पुण्यातल्या एका तरुणाच्या नावाने बनावट कागदपत्र सादर करून मोबाईल सीमकार्ड देण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ज्या तरुणाच्या नावाने हे सीमकार्ड देण्यात आले, त्याला याचा पत्ताच नव्हता. एका धमकी प्रकरणामध्ये पोलीस त्या तरुणाच्या घरी पोहोचले आणि ही खळबळजनक माहिती उजेडात आली. याप्रकरणी मोबाईल दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहंमद हसीम मोटारवाला (वय 21, रा. इंडीपेंडंट सोसायटी, फ्लॅट क्रमांक 2, कोंढवा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी इरफान जब्बार बकाली (वय 3क्, रा. हिल व्ह्यू सोसायटी, मिठानगर, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. कोंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बकाली हे टाटा डोकोमो या कंपनीमध्ये नोकरीस आहेत. तर, मोटारवाला हा मोबाईल सीमकार्ड विक्रेता आहे. सीरिया या देशातील बासील अबू रोहान (रा. मोहंमदवाडी, कोंढवा) हा मार्च महिन्यात पुण्यामध्ये शिक्षणासाठी आला आहे. त्याला भारतात वापरण्यासाठी मोबाईल हवा होता. त्यासाठी त्याने मोटारवाला याच्याशी संपर्क साधला. बासील याचे स्थानिक रहिवासी पुरावे नसल्यामुळे त्याला सीमकार्ड मिळणार नसल्याची कल्पना मोटारवाला याला होती.
त्यामुळे त्याने गौरव रमेश सुतार (रा. घर क्र. 14, रा. सव्र्हे क्र. 174, सोलापूर रस्ता, हडपसर) याच्या नावाने बनावट कागदपत्रे सादर करून नवीन सीमकार्ड मिळवले. टाटा डोकोमो कंपनीचे हे सीमकार्ड त्याने बासील याला वापरायला दिले होते. या मोबाईल क्रमांकावरून आपल्या खंडणीची धमकी आल्याची तक्रार सौदी अरेबियामधील एका तरुणीने स्थानिक पोलिसांकडे केली होती. हा क्रमांक भारतातील असल्यामुळे सौदी अरेबियाने याची माहिती दिल्ली येथील दूतावासाला कळविली. दिल्लीमधून सूत्रे हलल्यावर पुणो पोलिसांना या प्रकरणाच्या तपास करण्याचे आदेश देण्यात आले. पुणो पोलिसांनी मिळालेल्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे तपास केला. हा मोबाईल क्रमांक गौरवच्या नावाने असल्यामुळे पोलीस त्याच्या घरी पोचले, तेव्हा गौरवने आपण हे सीमकार्ड घेतलेच नसल्याचे सांगितल्यावर पोलीस चक्रावले. त्यांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे बासीलला शोधून काढले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर पोलीस मोटारवालार्पयत पोहोचले. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
4बासील हा मूळचा सीरियाचा रहिवासी आहे. त्याची चॅटिंगद्वारे सौदी अरेबियाच्या एका तरुणीसोबत ओळख झाली होती. तिला बासील
याच्याशी लग्न करायचे होते; परंतु त्याने नकार दिला. त्यामुळे या तरुणीने बासील याने खंडणी मागितल्याची खोटी तक्रार सौदी पोलिसांकडे केली होती.
4सौदी सरकारने भारत सरकारशी संपर्क साधून माहिती दिल्यावर दिल्लीहून मुंबई आणि मुंबईहून पुणो अशी गतीने चक्रे फिरली. फिर्यादी तरुणीने जो मोबाईल क्रमांक दिला होता, त्यावरुन पोलीस बासीलर्पयत पोचले.
4परंतु, मोबाईलचा संपूर्ण डाटा मिळवल्यावर मात्र या तक्रारीत तथ्य नसल्याचे समोर आले.
4सौदीच्या तरुणीने सौदी आणि सीरियामध्ये असलेल्या तणावाचा स्वत:चा वैयक्तिक सूड उगवण्यासाठी प्रयत्न केल्याचे समोर आले.
एका ङोरॉक्सवर मिळते सीमकार्ड
4सध्या कोणत्याही दुकानामध्ये मोबाईल कंपनीचे सीमकार्ड मिळण्यासाठीचे अर्ज उपलब्ध असतात. दुकानदार ओळखीचा असला की केवळ एखाद्या पुराव्याच्या ङोरॉक्सवर अर्ज न भरताच सीमकार्ड दिले जाते. त्यामुळे कोणीही सीमकार्ड घेऊन जाऊ शकतो.