तृतीयपंथीयांच्या न्यायासाठी धडपड!

By Admin | Published: April 12, 2015 01:04 AM2015-04-12T01:04:09+5:302015-04-12T01:04:09+5:30

तृतीयपंथीयांसाठी भांडते. त्यांच्यासाठी जीवही धोक्यात घालते़ एखाद्या चित्रपटात शोभेल असे हे कथानक वाटते, मात्र संगीता तांबे पाच वर्षांपासून धुळ्यात हे काम करत आहेत.

Tactics for the trials of third parties! | तृतीयपंथीयांच्या न्यायासाठी धडपड!

तृतीयपंथीयांच्या न्यायासाठी धडपड!

googlenewsNext

निखिल कुलकर्णी ल्ल धुळे
तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुण्यातून एक महिला धुळ्यात येते. तृतीयपंथीयांसाठी भांडते. त्यांच्यासाठी जीवही धोक्यात घालते़ एखाद्या चित्रपटात शोभेल असे हे कथानक वाटते, मात्र संगीता तांबे पाच वर्षांपासून धुळ्यात हे काम करत आहेत. पुण्यातील ‘उडान’ या तृतीयपंथीयांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेत १४ वर्षे काम पाहिल्यानंतर संगीता तांबे यांनी धुळ्यात राही फाउंडेशनची स्थापना करून त्याद्वारे काम सुरू केले.
धुळे जिल्ह्यात १,६०० तृतीयपंथीय असल्याचे त्यांना आढळून आले़ तृतीयपंथीयांची एचआयव्ही चाचणी करणे, ती पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांच्यावर मोफत उपचार करणे इ. उपक्रम संस्थेकडून राबवले जात आहेत.
तृतीयपंथीयांना आधार, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र यांसह शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. ‘द हमसफर ट्रस्ट’कडून त्यासाठी राही फाउंडेशनला मदत केली जात आहे.

कलम ३७७ला विरोध
कलम ३७७ अर्थात समलिंगी संबंधास मान्यता देण्याबाबतच्या निर्णयाला विरोध असल्याने त्यासाठी दिल्ली दरबारी संघर्ष करीत असल्याचे संगीता तांबे सांगतात़ कलम ३७७ केवळ समलिंगी संबंध नसून अनैसर्गिक संबंध ठेवल्यास लागू होणारे हे कलम आहे़ परंतु त्याचा योग्य पद्धतीने प्रचार होत नसल्याचे त्यांनी सांगितले़

Web Title: Tactics for the trials of third parties!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.