ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात चक्क वाघाने पळवलं मजुराचं टोपलं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 05:18 PM2018-01-08T17:18:02+5:302018-01-08T20:25:20+5:30
वाघाच्या हमखास दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपुरातील चिमूर येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात जंगली प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. त्यातच वाघांची संख्याही लक्षणीय आहे.
- राजकुमार चुनारकर
चिमूर : वाघाच्या हमखास दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपुरातील चिमूर येथील ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात जंगली प्राण्यांचा मोठया प्रमाणात वावर आहे. त्यातच वाघांची संख्याही लक्षणीय आहे. ६ जानेवारीला सकाळच्या सुमारास नवेगाव गेटच्या परिसरात रोडचे काम सुरू आहे. या कामावरील मजुरांनी झाडाखाली माती टाकण्यासाठी फायबरचे टोपले ठेवले होते. अचानक जंगलाच्या राजाने चक्क टोपले तोंडात घेऊन पसार होतानाचा क्षण गाईडने आपल्या कॅमेऱ्यात टिपला. जंगलाच्या राजाची या महिन्यातील ही दुसरी लीला आहे. देश-विदेशातील पर्यटक वाघाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देतात. पर्यटकांनाही हमखास वाघाचे दर्शन होते. त्यामुळे दिवसागणिक पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ताडोबाची जगात ओळख निर्माण झाली आहे.
ताडोबातील वाघांची संख्या वाढल्याने वाघाच्या वावरासाठी जंगल कमी पडू लागल्याचे वन्यजीव प्रेमींकडून ओरड केली जात आहे, वाघ जास्त असल्याने कुठल्या ना कुठल्या स्थळी वाघ पर्यटकांना दिसत आहे. सध्या पर्यटकांच्या सुलभ प्रवासासाठी ताडोबातील अंतर्गत रस्त्याचे काम सुरू आहे. खडसंगी ते नवेगाव ताडोबा या रोडवर खडीकरण करणे सुरू आहे, या कामावर गिट्टी मुरूम पसरवण्यासाठी मजूर काम करीत आहेत.
शनिवार ६ जानेवारीला सकाळच्या सुमारास नवेगाव गेटपासून काही अंतरावर मजूर काम करीत असताना त्यांचे प्लॅस्टिकचे टोपले तोंडात घेऊन जंगलाचा राजा पसार झाल्याचा क्षण काही पर्यटक व गाईडने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. असाच काहीसा प्रकार मोहली परिसरातील मजुरांचे जेवनाचे टिफीन तोंडात घेवून वाघोबा पसार आला होता . आता अचानक ही घटना घ२ल्याने मजुरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र या घटनेपासून पर्यटकांना चांगलाच आनंद मिळाला आहे. जंगलाच्या राजाच्या या लीला पर्यटकांना चांगल्याच भावत आहेत.