ताडोबात पाच वर्षांत ५ लाख पर्यटक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2017 03:59 AM2017-01-06T03:59:37+5:302017-01-06T03:59:37+5:30
व्याघ्र पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला गेल्या पाच वर्षांत पाच लाखांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली
नागपूर : व्याघ्र पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला गेल्या पाच वर्षांत पाच लाखांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली. यातून शासनाला १४ कोटी रुपयांहून अधिकचा महसूल प्राप्त झाला. मात्र २०१६ मध्ये पर्यटकांची संख्या तुलनेने कमी होती. उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत पर्यटनासंदर्भात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडे विचारणा केली होती. २०१२-१३ ते आॅक्टोबर २०१६ या कालावधीत किती पर्यटक प्रकल्पात आले, यातून किती महसूल प्राप्त झाला, किती वाघांचा मृत्यू झाला, इत्यादी प्रश्नांची त्यांनी विचारणा केली होती. या कालावधीत प्रकल्पाला एकूण ५ लाख ३ हजार ८३१ पर्यटकांनी भेट दिली.जानेवारी ते आॅक्टोबर कालावधीत ६७ हजार ९५३ पर्यटकांनी भेट दिली. (प्रतिनिधी)