तहव्वूर राणाने त्याच्या कार्यालयाचा वापर करण्यापासून रोखले होते, डेव्हिड हेडलीची माहिती

By admin | Published: March 23, 2016 02:09 PM2016-03-23T14:09:45+5:302016-03-23T14:09:45+5:30

खटल्यातील आरोपी अबू जुंदालचे वकील डेव्हिड हेडलीची उलटतपासणी करत आहेत.ही उलटतपासणी २३ मार्च ते २५ मार्चपर्यंत चालण्याची शक्यता आहे

Tahawwur Rana prevented him from using his office, David Headley's information | तहव्वूर राणाने त्याच्या कार्यालयाचा वापर करण्यापासून रोखले होते, डेव्हिड हेडलीची माहिती

तहव्वूर राणाने त्याच्या कार्यालयाचा वापर करण्यापासून रोखले होते, डेव्हिड हेडलीची माहिती

Next
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. २३ - मुंबई 26/11 दहशतवादी हल्याचा माफीचा साक्षीदार बनलेला लष्कर-ए-तोयबाचा अमेरिकन-पाकिस्तानी डेव्हिड हेडलीच्या उलटतपासणीला सुरुवात झाली आहे. बुधवारी उलटतपासणीदरम्यान डेव्हिड हेडलीला पत्नी शाजिया गिलानी आणि तहव्वूर राणा यांच्या सहभागाविषयी प्रश्न विचारण्यात आले. हेडलीने यावेळी आपला ड्रग्जचा व्यवसाय, पाकिस्तान दौरा, अमेरिकेतील खटले, तहव्वूर राणा यासंबंधी माहिती दिली. 
 
खटल्यातील आरोपी अबू जुंदालचे वकील डेव्हिड हेडलीची उलटतपासणी करत आहेत.ही उलटतपासणी २३ मार्च ते २५ मार्चपर्यंत चालण्याची शक्यता आहे. पत्नी शाजिया गिलानीसंबंधी विचारलेल्या प्रश्नावर 'माझ्याबद्दल प्रश्न विचारा माझ्या बायकोबद्दल नाही' म्हणत डेव्हिड हेडलीने उत्तर देण्यास नकार दिला. मात्र आपल्या पत्नीला आपल्या लष्कर-ए-तोयबामधील सहभागाविषयी माहिती असल्याचं त्याने सांगितलं आहे. 
 
तसंच तहव्वूर राणा यालादेखील मी लष्कर-ए-तोयबाशी संलग्न असल्याची माहिती होतीय मात्र  तहव्वूर राणा दहशतवादी संघटनांच्या संपर्कात नव्हता. तहव्वूर राणा याला जेव्हा मुंबई 26/11 दहशतवाही हल्ल्याचा कट रचला जात असल्याची माहिती मिळाली तेव्हा त्याने त्याचा कार्यालयाचा वापर करण्यापासून रोखले असल्याची माहिती हेडलीने न्यायालयात दिली आहे. तहव्वूर राणाने हेडलीला 26/11 हल्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. तहव्वूर राणा सध्या अमेरिकेतील जेलमध्ये असून 26/11 हल्ला प्रकरणी त्याच्यावरील आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत.  
ड्रग्जची तस्करी केल्याबद्दल अमेरिकन न्यायालयात दोन वेळा शिक्षा झाली असल्यांच डेव्हिड हेडलीने कबूल केलं आहे. 1992 पासून ते 1998 पर्यंत मी ड्रग्जच्या व्यवसायात होतो. पाकिस्तानातील झेब शाह नावाची व्यक्ती मला ड्रग्जच्या व्यवसायात मदत करत होती. 2006 मध्ये झेब शाहशी भारतात हत्यारांची तस्करी करण्याबाबात प्रथमच मी बोलला होतो, मात्र मी तस्करी करण्याचा प्रयत्न करत नव्हतो अशी माहिती हेडलीने दिली आहे. 
 
लाहोरमधील माझ्यासोबत असणा-या लोकांकडून मी पंजाबी शिकलो आहे त्यामुळे मी पंजाबी भाषा बोलू शकतो. लष्कर-ए- तोयबाकडून पैसे मिळत नव्हते, मात्र मीच फंडींग करत होतो. तसंच मी लष्कर-ए-तोयबाला 60 ते 70 लाख रुपये दिले असल्याची कबुलीही हेडलीने दिली आहे. 1992 ते 1998 दरम्यान पाकिस्तान दौ-यासाठी अंमलबजावणी संचलनालयाच्या संचालकांनी फंडींग केल्याची माहितीदेखील हेडलीने दिली आहे. 

Web Title: Tahawwur Rana prevented him from using his office, David Headley's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.