अकृषिक वापराबाबत तहसीलची कारवाई

By Admin | Published: November 3, 2016 02:44 AM2016-11-03T02:44:17+5:302016-11-03T02:44:17+5:30

तालुक्यातील गावामधून अनधिकृत अकृषिक वापराबाबत नागरिकांकडून महसूल विभागामार्फत दंड आकारला

Tahsil Action on Agricultural Applications | अकृषिक वापराबाबत तहसीलची कारवाई

अकृषिक वापराबाबत तहसीलची कारवाई

googlenewsNext

मयूर तांबडे,

पनवेल- तालुक्यातील गावामधून अनधिकृत अकृषिक वापराबाबत नागरिकांकडून महसूल विभागामार्फत दंड आकारला जात असून सद्यस्थितीत तब्बल ७४ लाख ४९ हजार ५ रु पयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी तहसील विभागाकडे लाखो रु पये दंड जमा केला आहे.
पनवेल तालुक्यातील अनेक गावांमधील नागरिक अकृषिक वापराबाबतचा महसूल बुडवत होते. त्यामुळे लाखो रु पयांचा महसूल बुडत होता. या सर्व नागरिकांना तहसील कार्यालयाकडून तलाठ्यांतर्फेअनधिकृत कृषी वापराबाबत नोटीस देवून दंड आकारण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार तलाठ्यांनी नोटीस बजावून या अनधिकृत कृषीधारकांकडून दंड वसुली सुरू करून लाखो रु पये दंड वसूल केला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना अकृषिक जमिनी वापरल्याबद्दल दंड आकारला जात आहे. अनधिकृत अकृषिकधारकांकडून दंडाची वसुली सुरु झाली असताना नागरिकांना दंड भरण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. तालुक्यातील चाळ, वहाळ, चिंचवली तर्फेतळोजे, महालुंगी, पाले खुर्द, शिवणसई, कर्नाळा, पळस्पे, बारवई, खानावले, आपटे, पाले बुद्रुक, शेडुंग, आकुर्ली, आजिवली, उसरली खुर्द, नेरे, वळवली, चिंचवली तर्फे वाजे, गुलसुंदे कोळखे, आष्टे, वाजे, बबंबावी आदि गावांमधून शेकडो नागरिकांकडून अनधिकृत अकृषिक वापराबाबतचा ७४ लाख रु पये दंड वसूल करण्यात आला आहे. तालुक्यातील १८७ अकृषिक वापर करणाऱ्यांकडून एकूण ३,२२,७१८.१ चौरस मीटर जागेचे ७४ लाख ४९ हजार ५ रु पये वसूल करण्यात आले आहेत.
>अनधिकृत बांधकामसंबंधी मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यामार्फत सजे मजकूर गावातील संबंधित खातेदारांवर तहसीलमार्फत कलम १४५ महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ अन्वये कारवाई केली आहे. दंडनीय रक्कम भरणेबाबत नोटिसा देण्यात आल्या होत्या. संबंधित बिनशेती वापरात बदल याबाबत एकूण ७४ लाखांहून अधिक रु पये वसूल केले आहेत.
- बी.टी.गोसावी,
नायब तहसीलदार, पनवेल

Web Title: Tahsil Action on Agricultural Applications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.