ताई, आमच्या केळीला भाव मिळवून द्या ना...चिमुकलीची सुप्रिया सुळेंना आर्त हाक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 03:55 PM2018-02-20T15:55:10+5:302018-02-20T15:57:04+5:30

ताई , आमचे पप्पा खूप मेहनत करुन केळी पिकवतात. पण केळीला भाव नसल्यामुळे ते चिंतेत आहेत. माझ्यासोबत खेळत नाही. ताई तुम्ही काहीतरी करा पण...

Tai, get our prices for banana, do not ... Supriya Sule of Chimukali Arth | ताई, आमच्या केळीला भाव मिळवून द्या ना...चिमुकलीची सुप्रिया सुळेंना आर्त हाक

ताई, आमच्या केळीला भाव मिळवून द्या ना...चिमुकलीची सुप्रिया सुळेंना आर्त हाक

Next

रावेर ( जळगाव ) दि 20 - ताई , आमचे पप्पा खूप मेहनत करुन केळी पिकवतात. पण केळीला भाव नसल्यामुळे ते चिंतेत आहेत. माझ्यासोबत खेळत नाही. ताई तुम्ही काहीतरी करा पण आमच्या केळीला भाव मिळवून द्या, अशी आर्त हाक चौथीत शिकणार्‍या राजश्री देवानंद पाटील या चिमुकलीने आज  खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे करत आपल्या शेतातील केळी सुप्रिया सुळेंना भेट दिली.

राजश्रीची विनंती ऐकल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी केळीला भाव मिळवून देण्यासाठीच आम्ही ही हल्लाबोल यात्रा काढली असल्याची तिची समजूत घातली.  तसेच आमचे नेते विधीमंडळात याबाबतीत आवाज उचलतील असे आश्वासन दिले. त्या मुलीने दिलेली केळी सुप्रिया सुळे , धनंजय मुंडे व इतर नेत्यांनी खाऊन मुलीची समजूत काढत तिच्या पालकांना धीर देत पुढे मार्गक्रमण केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा तिसरा टप्पा सध्या उत्तर महाराष्ट्रात सुरु असून आज रावेर येथील सभेला राष्ट्रवादीचे नेते जळगाव हून रावेर साठी निघाले होते. वाटते निंबोरा या गावात देवानंद पाटील यांची केळीची बागेला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भेट दिली.  यावेळी शेतकरी देवानंद पाटील म्हणाले की, "सध्या केळीला ७०० प्रति क्विंटल भाव मिळत आहे. आघाडी सरकारच्या काळात १००० ते १२०० भाव मिळत होता. करपा रोगाने यंदा केळीचे मोठे नुकसान केले असून त्याची नुकसान भरपाई मिळालेली नाही. पिक विमा मिळायलाही अडचण येत आहे. त्यातच वीज बिल भरमसाठ आल्यामुळे ते भरले जात नाहीत. कर्जमाफी तर दुरच राहिली." 

 

Web Title: Tai, get our prices for banana, do not ... Supriya Sule of Chimukali Arth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.