लातूरातील अल्पवयीन मुलींची तस्करी करणाऱ्या टोळीवर कठोर कार्यवाही करा, नीलम गोऱ्हेंची मुख्यमंत्र्याकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2017 08:40 PM2017-08-03T20:40:23+5:302017-08-03T20:41:00+5:30

Take action against gangs of smugglers of minority girls, demanded by the Chief Minister of Sapphire Gorhe | लातूरातील अल्पवयीन मुलींची तस्करी करणाऱ्या टोळीवर कठोर कार्यवाही करा, नीलम गोऱ्हेंची मुख्यमंत्र्याकडे मागणी

लातूरातील अल्पवयीन मुलींची तस्करी करणाऱ्या टोळीवर कठोर कार्यवाही करा, नीलम गोऱ्हेंची मुख्यमंत्र्याकडे मागणी

Next

मुंबई, दि. 3 - लातूर जिल्ह्यातील उदगीर भागात अल्पवयीन मुलीना फूस लावून पळवून नेण्याच्या घटना गेल्या काही वर्षांत वाढल्या आहेत. दिनांक २ ऑगस्ट २०१७ रोजी पैशाच्या मोबदल्यात जाळ्यात सापडतील अशा मुलींचा शोध घेऊन देशभरात लग्न लावून देणारी टोळी लातूर पोलिसांनी पकडली आहे. या टोळीत एका राजकीय पक्षाची कार्यकर्ती असलेल्या महिलेचाही समावेश आहे. असे शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीय यांना दिलेलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

या निवेदनात गोऱ्हे म्हणाल्या की, या टोळीनं दिनांक एक जुलै २०१७ ला लातूरमधून अकरा वर्षांची मुलीला गोड बोलून हातोहात पळवलं. मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिली. या मुलीला या टोळीने सांगली जिल्ह्यातील तासगावातल्या सावर्डे गावातल्या 34 वर्षीय उमेश जगन्नाथ माने या इसमाला विकले होते. पण 25 दिवस मुलीचा पत्ता लागला नाही. मात्र, संधी मिळताच या मुलीने आपल्या कुटुंबियांना फोन केल्यावर पोलिसांनी त्वरीत कार्यवाही करून ही टोळी ताब्यात घेतली हे एक पोलिसांनी उचललेले योग्य पाऊल आहे. 
या प्रकरणाची अधिक माहिती घेतली असता राज्यातल्या 14 जिल्ह्यात या टोळ्या कार्यरत असून गेल्या वर्षभरात लातूर जिल्ह्यात 300 महिला, मुलींच्या मिसिंग केस दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, पोलीस अधीक्षकांच्या माहितीनुसार केवळ ६० मुली हरवल्या होत्या आणि त्यांचा शोध घेण्यात आला असून त्या सापडल्या आहेत. या मुलींचे शाळा महाविद्यालयांमध्ये शिक्षण सुरु असताना त्यात अचानक घडणाऱ्या अशा घटनांमुळे खंड पडतो आहे.  याबाबत गावनिहाय माहिती घेऊन कोम्बिंग ऑपरेशनद्वारे अशा दलालांवर  योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे.  पालकांच्या म्हणण्यानुसार या प्रकारच्या घटनेची तक्रार घ्यायला पोलीस टाळाटाळ करतात. परंतु, पालकच अशा गोष्टींची तक्रार देत नाहीत असा पोलिसांचा दावा आहे. हैद्राबाद, दिल्ली यासारख्या मोठ्या शहरातील कुंटणखान्यातही लातूर मराठवाडा परिसरातील मुली असल्याची माहिती काही स्वयंसेवी संस्थाकडून मिळाली आहे. अशा समाजकंटक प्रवृत्तीच्या लोकांवरदेखील प्रतिबंध घालणे अत्यावश्यक आहे.
महिला आणि मुलींची अवैधरीत्या वाहतुकीच्या या प्रश्नावर रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याच्या हेतूने बैठका आणि सुसंवाद होण्याची गरज या निमित्ताने वाटते. सन २०१५ मध्ये मी मराठवाडा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्याशी या प्रकारच्या गुन्ह्याबाबत कार्यवाही करण्याबाबत प्रत्यक्ष भेटून सूचना केली होती. त्याचबरोबर उदगीर भागात दोन वर्षांपूर्वी एका महिलेचे अशा प्रकारे फसवणूक केल्याबाबत आंदोलनातही मी सहभागी झाले होते. महिला व मुलीना फसवून वाममार्गाला लावण्याऱ्या या टोळ्या लातूरसह अन्य भागातही कार्यरत असून लातूरचा भाग सीमावर्ती असल्याने अशा प्रकारचे गुन्हे करुन पळून जाण्यात त्या यशस्वी होत आहेत.

मुख्यमंत्र्यांची त्वरीत दखल व सकारात्मक प्रतिसाद :
ज्या परिवारातून मुलगी हरवली असेल त्या कुटुंबीयांकडून तक्रारी येत नाहीत, अशावेळी पोलिसांनी विशेष मोहीम वा कोम्बिंग ऑपरेशनद्वारे अशा शाळा सोडलेल्या अल्पवयीन मुलींचा शोध घेणे गरजेचे आहे या आ. डॉ. गोऱ्हे यांच्या सूचनेवर मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरीत कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे

Web Title: Take action against gangs of smugglers of minority girls, demanded by the Chief Minister of Sapphire Gorhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.