लाठीमार करणाऱ्या पोलीसांवर कारवाई करा,विखे-पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By admin | Published: January 19, 2017 10:47 PM2017-01-19T22:47:39+5:302017-01-19T22:48:10+5:30

नोटाबंदी विरोधात बुधवारी नागपूर येथे रिझर्व्ह बँकेसमोर काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर अमानुष लाठीमार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी

Take action against the lathing policemen, the letter to the chief minister of Vikhe-Patil | लाठीमार करणाऱ्या पोलीसांवर कारवाई करा,विखे-पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

लाठीमार करणाऱ्या पोलीसांवर कारवाई करा,विखे-पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Next

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 19 - नोटाबंदी विरोधात बुधवारी नागपूर येथे रिझर्व्ह बँकेसमोर काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर अमानुष लाठीमार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या या पत्रात म्हटले आहे की, काँग्रेसचे आंदोलन अतिशय शांततापूर्ण मार्गाने सुरू होते. आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ बँंकेच्या आत गेले असता बाहेर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर प्रचंड लाठीमार केला. त्यामध्ये अनेकांना दुखापती झाल्या. दडपशाही पद्धतीने आंदोलन पांगविण्याचा प्रयत्न केल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी पोलिसांना विचारणा केली असता त्यांनाही मारहाण करून ताब्यात घेण्यात आले. पोलीस प्रशासनाच्या या दडपशाहीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाला त्याच ठिकाणी पुन्हा ठिय्या आंदोलन करावे लागले. पोलिसांच्या  बेजबाबदारपणामुळे शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांवर नाहक लाठीमार करून परिस्थिती गंभीर करण्याच्या या प्रकाराची चौकशी करून दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी विखे पाटील यांनी पत्रात केली आहे.

Web Title: Take action against the lathing policemen, the letter to the chief minister of Vikhe-Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.