कांदा साठेबाजांवर कारवाई करा

By admin | Published: June 28, 2014 12:48 AM2014-06-28T00:48:29+5:302014-06-28T00:48:29+5:30

व्यापारी आणि एपीएमसी मधील अधिका-यांच्या साटेलोटय़ामुळे कांद्याची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. यामुळेच मुबलक प्रमाणात उपलब्ध असूनही कांद्याचे भाव कडाडले आहेत.

Take action against onion stockists | कांदा साठेबाजांवर कारवाई करा

कांदा साठेबाजांवर कारवाई करा

Next
>मुंबई :  व्यापारी आणि एपीएमसी मधील अधिका-यांच्या साटेलोटय़ामुळे कांद्याची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. यामुळेच मुबलक प्रमाणात उपलब्ध असूनही कांद्याचे भाव कडाडले आहेत. या प्रकरणी 
राज्य शासनाने तातडीने लक्ष 
घालून साठेबाजांवर कडक द्य
कारवाई करावी, अशी मागणी 
विधान परिषद विरोधी पक्षनेते 
विनोद तावडे यांनी आज पत्र परिषदेत केली.
 सध्या बाजारात उपलब्ध असलेला कांदा हा नुकत्याच संपलेल्या हंगामातील आहे. त्यामुळे लांबलेल्या मान्सूनचा बाजारपेठेतील कांद्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. केवळ साठेबाजांनी कृत्रिम टंचाई निर्माण केल्यामुळे कांद्याची भाववाढ होत आहे. त्यामुळे या साठेबाजांवर तात्काळ कारवाई करण्याची 
मागणी आपण मुख्यमंत्नी पृथ्वीराज चव्हाण यांचेकडे लेखी पत्र 
पाठवून केली आहे, असे तावडे यांनी सांगितले.
यापूर्वीही अनेकवेळा कांद्याची भाववाढ झाली. अशा प्रसंगी राज्य सरकारने पूर्वीच्या युपीए सरकारला काही सूचना केल्या असतील अथवा केंद्राने काही विशेष उपाय योजले असतील, तर त्याची माहिती 
द्यावी. जेणोकरून केंद्र सरकारशी 
योग्य समन्वय साधता येईल आणि राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी व सामान्य जनतेवर अन्याय होणार 
नाही यासाठी प्रयत्न करता येईल, असे आपण मुख्यमंत्र्यांना दिलेल्या 
पत्रत नमूद केल्याची माहिती तावडे यांनी दिली. 
(प्रतिनिधी)
 
शशिकांत शिंदे यांचा राजीनामा घ्या
एपीएमसी संचालकांच्या निर्णयामुळे 138 कोटी रूपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी पणन संचालकांनी ठपका ठेवलेले एपीएमसीचे संचालक 
आणि राज्याचे जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांच्याविरुध्द तातडीने 
फौजदारी कारवाई करण्याची मागणी तावडे यांनी  केली.एपीएमसी संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या पणन महासंचालकांच्या आदेशाला कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्थगिती दिली आहे. भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचा हा प्रकार असून या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचेही तावडे यांनी सांगितले.

Web Title: Take action against onion stockists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.