पाटण संमेलनातील ‘त्या’ वक्त्यांवर कारवाई करा!

By admin | Published: October 13, 2016 05:18 AM2016-10-13T05:18:27+5:302016-10-13T05:18:27+5:30

‘पाटण येथील ‘मसाप’च्या विभागीय साहित्य संमेलनात महापुरुषांबाबत भडक वक्तव्ये करणाऱ्या साहित्यिकांच्या भाषणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तातडीने कडक

Take action against the 'those' speakers in Patan Sammelan! | पाटण संमेलनातील ‘त्या’ वक्त्यांवर कारवाई करा!

पाटण संमेलनातील ‘त्या’ वक्त्यांवर कारवाई करा!

Next

सातारा : ‘पाटण येथील ‘मसाप’च्या विभागीय साहित्य संमेलनात महापुरुषांबाबत भडक वक्तव्ये करणाऱ्या साहित्यिकांच्या भाषणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तातडीने कडक कारवाई करावी,’ अशी मागणी शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.
या संमेलनात प्रा. डॉ. रावसाहेब कसबे व प्रा. डॉ. प्रज्ञा पवार यांनी आपल्या भाषणात महापुरुषांचा अवमान करणारी वादग्रस्त वक्तव्ये केल्याच्या आरोपानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी या दोघांनाही संमेलनाचे स्थळ सोडण्याचा आग्रह धरला होता.
समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून संयोजकांनीही तातडीने पुढील नियोजित कार्यक्रम रद्द केला होता. त्यामुळे या दोन साहित्यिकांवर कायदेशीर कारवाई करावी,
अशी मागणी आमदार देसाई यांनी जिल्हाधिकारी डॉ. अश्विन मुदगल
व पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Take action against the 'those' speakers in Patan Sammelan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.