श्यामच्या आईबद्दल विकृत मीम व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करा; गृहमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 06:51 PM2020-07-22T18:51:51+5:302020-07-22T19:03:27+5:30

श्याम आणि श्यामची आई यांच्या फोटोवर आक्षेपार्ह मजकूर; फोटो फेसबुकवर व्हायरल

take action against those who created memes over shyamchi aai mail written to anil deshmukh | श्यामच्या आईबद्दल विकृत मीम व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करा; गृहमंत्र्यांकडे मागणी

श्यामच्या आईबद्दल विकृत मीम व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करा; गृहमंत्र्यांकडे मागणी

googlenewsNext

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरल्या जाणारा मास्क आणि दारू यांचा संबंध श्यामची आई आणि श्यामसोबत जोडून सोशल मीडियात विकृत मीम व्हायरल करण्यात आलं आहे. त्या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मेल करण्यात आला आहे. 

'महाराष्ट्रासाठी आदरणीय व्यक्तीमत्त्व असलेल्या साने गुरुजी यांनी लिहिलेल्या 'श्यामची आई' पुस्तकानं गेली ८५ वर्षे अनेक पिढ्यांवर संस्कार केले. श्याम आणि त्याची आई यांच्यातील संवादानं कित्येक पिढ्यांना जगण्याची दिशा दिली. यावर 'आचार्य अत्रे' यांनी चित्रपट काढला. या चित्रपटातील श्याम आणि त्याची आई यांचे चित्र महाराष्ट्रात अनेक जण श्रद्धेने बघतात. त्यापासून प्रेरणा घेतात. आपल्या मुलांना 'श्यामची आई' हे पुस्तक वाचायला देतात. अशा पार्श्वभूमीवर श्याम व त्याची आई यांचा फोटो एडिट करून त्यावर अत्यंत विकृत मजकूर लिहिण्यात आलेला आहे. हा फोटो सध्या फेसबुकवर फिरतो आहे. त्यात बायकोला दारूचा वास येऊ नये आणि कोरोना होऊ नये म्हणून काय वापरशील? यावर श्याम 'मास्क' असे उत्तर देतो, असा उल्लेख आहे,'  अशी माहिती गृहमंत्र्यांना करण्यात आलेल्या मेलमध्ये आहे.

संपूर्ण समाजामध्ये श्यामची एक सालस संस्कारित अशी प्रतिमा आहे. मात्र एडिट केलेल्या फोटोमुळे श्याम आणि साने गुरुजींबद्दल असलेल्या श्रद्धेला तडा देण्याचं काम केलं आहे. त्यामुळे ही पोस्ट तयार करणाऱ्या व ती फॉरवर्ड करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मेलमधून करण्यात आली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सध्याची घडीला मास्क घालण्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र अशा प्रकारे मास्कची खिल्ली उडवणं हे कोरोनाविरोधातील मोहिमेचंदेखील गांभीर्य कमी करणारं आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन सोशल मीडियावर असे फोटो कुठून आले, याचा शोध घेऊन सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल करण्याची विनंती गृहमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

...तर बाबरी आम्हीच पाडली, हे सांगण्याचं धाडस भाजपा का दाखवत नाही?; राऊतांचा थेट सवाल

"काही जणांना नरेंद्र मोदी आवडत नाहीत, त्यांचं नाव घेताच काहींच्या पोटात दुखतं"; शरद पवारांना टोमणा

Web Title: take action against those who created memes over shyamchi aai mail written to anil deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.