राज्यातील दुष्काळ दूर कर : प्रभू

By admin | Published: September 17, 2015 11:17 PM2015-09-17T23:17:20+5:302015-09-17T23:45:48+5:30

बाप्पांचे आगमन : पावसाची संततधार, मालवणात वीजेचा खेळखंडोबा

Take away the famine from the land: Lord | राज्यातील दुष्काळ दूर कर : प्रभू

राज्यातील दुष्काळ दूर कर : प्रभू

Next

मालवण : तालुक्यात घरोघरी गणराया विराजमान झाल्याने सर्वत्र गुरूवारी मंगलमय वातावरण होते. शहरातील मेढा येथील निवासस्थानी गणेशोत्सवासाठी आलेल्या केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी अन्य कोणत्याही विषयवार भाष्य न करता राज्यात पडलेला गंभीर दुष्काळ दूर करण्याचे मागणे गणेश चरणी मागितल्याचे सांगितले. यावेळी सौ. उमा प्रभू, अमेय प्रभू, विजय केनवडेकर, डॉ. शशिकांत झांटये व अन्य उपस्थित होते. कोकणवासियांचा लाडक्या गणेशोत्सवाची सुरुवात रिमझिम पावसाच्या सरींनी झाली. तालुक्यात मालवण शहर व अन्य भागात बाप्पाचे भक्तीमय वातावरणात जल्लोषी स्वागत करण्यात आले. बुधवारी रात्रीपासून पावसाची संततधार गुरुवारी दिवसभर कायम होती. त्यामुळे गणेश मूर्ती घरी नेताना धांदल उडविली. दरम्यान गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी बसस्थानक परिसरातील ट्रान्सफार्मरात बिघाड झाल्याने शहरात दिवसभर वीजेचा खेळखंडोबा सुरु होता. खासदार विनायक राऊत यांनी प्रभू यांच्या निवासस्थानी भेट घेत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी तालुकाप्रमुख बबन शिंदे, नंदू गवंडी, सन्मेश परब उपस्थित होते. मालवण तालुक्यात आचरा रामेश्वर मंदिर, किल्ले सिंधुदुर्ग शिवराजेश्वर मंदिर, बाजारपेठ हनुमान मंदिर, भरड दत्त मंदिर, मालवण पोलीस ठाणे व बसस्थानक आदी ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवासह तालुक्यात हजारो घरी गणराया विराजमान झाले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Take away the famine from the land: Lord

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.