अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांचा इतिहास परत घ्या अन्यथा... धनंजय मुंडेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 03:19 PM2019-10-17T15:19:59+5:302019-10-17T15:21:16+5:30

ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Take back the history of Shivaji Maharaj in the 4th std ... Dhananjay Munde warn to government | अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांचा इतिहास परत घ्या अन्यथा... धनंजय मुंडेंचा इशारा

अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांचा इतिहास परत घ्या अन्यथा... धनंजय मुंडेंचा इशारा

Next

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांवर लाखो मावळे आजही जीव ओवाळून टाकतात. त्यामुळे, हीच मावळे, जनता भाजपा-शिवसेना सरकारलाछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी सरकारवर टीका केली. शिवाजी महाराजांचा इतिहास चौथीच्या अभ्यासक्रमातून गाळल्याच्या बातम्या आल्यानंतर मुंडेंनी आपला संताप व्यक्त केला आहे.  

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून जगभरात महाराजांचा इतिहास माहिती आहे. संबंध जग महाराजांच्या शौर्यापुढे नतमस्तक होते, पण महाराष्ट्र शिक्षण मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा चौथीच्या पुस्तकातून वगळला आहे. वारंवार भाजपा-शिवसेनेचं सरकार एकीकडे महाराजांचं नाव घेतं आणि दुसरीकडे शिवाजी महाराजांना अपमानित करतं. पण, महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न कराल तर, महाराष्ट्र हे कधीही खपवून घेणार नाही. त्यामुळे, त्वरीत महाराजांचा इतिहास अभ्यासक्रमात सामावून घ्या, अन्यथा जनताच तुम्हाला याच मातीत गाडेल, असे धनंजय मुंडेंनी म्हटलंय. 

ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकीकडे केंद्रीय शिक्षण मंडळातून छत्रपतींचा इतिहास डावलला जात असल्याची टीका होत असतानाच राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने चौथीच्या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांचाइतिहास हद्दपार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्राची संस्कृती जपत आंतरराष्ट्रीय शिक्षण राज्यातील विद्यार्थ्यांना मिळावं या दृष्टीने महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची सुरुवात केली. या मंडळाने यंदा पहिली ते चौथीच्या पुस्तकाची छपाई केली आहे. त्यातून ही बाब समोर आली. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना शिवाजी महाराजांचा इतिहास कधीही न बदलण्याचा ठराव विधिमंडळात झाला होता. त्यानंतर अनेक सरकार बदलली मात्र पुस्तकातील अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कायम ठेवण्यात आला होता. या प्रकारावर बोलण्यास आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. मात्र, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी या सरकारला इशारा दिला आहे. 

छत्रपतींवरील धडा वगळू नये, या विधिमंडळाने केलेल्या ठरवाचेही उल्लंघन या सरकारने केले. महाराजांचा इतिहास जनमानसातून पुसून टाकण्याच्या भाजपाचा हा कट आहे. राज्यातील जनतेत प्रचंड असंतोष आहे. शिवछत्रपतींचा अपमान करणाऱ्या भाजपाला 21 तारखेला धडा शिकवल्याशिवाय जनता आता स्वस्थ बसणार नाही, असे धनंजय मुंडेंनी म्हटले. 

Web Title: Take back the history of Shivaji Maharaj in the 4th std ... Dhananjay Munde warn to government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.