पुणेकरांनो, 'स्वाईन फ्ल्यू' सावधान : अशी घ्या काळजी, ही आहेत लक्षणे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 07:53 PM2018-09-08T19:53:43+5:302018-09-08T19:58:59+5:30

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेवला आहे. या पार्श्वभुमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने संसर्गजन्य आजार होऊ नयेत, म्हणून नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे. 

Take care, these are symptoms and precaution of 'Swine flue' | पुणेकरांनो, 'स्वाईन फ्ल्यू' सावधान : अशी घ्या काळजी, ही आहेत लक्षणे

पुणेकरांनो, 'स्वाईन फ्ल्यू' सावधान : अशी घ्या काळजी, ही आहेत लक्षणे

Next

पुणे : शहरात स्वाईन फ्लुच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेवला आहे. या पार्श्वभुमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने संसर्गजन्य आजार होऊ नयेत, म्हणून नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे. 

         शहरात सध्या स्वाईन फ्लु व डेंग्युचे संशयित रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. स्वाईन फ्लु हा संसर्गजन्य आजार असल्याने योग्य काळजी न घेतल्यास त्याचा प्रसार लगेच होतो. दि. १ जानेवारीपासून आतापर्यंत ११९ जणांना स्वाईन फ्लुची लागण झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी (दि. ८) २ हजार ५९० संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १०१ रुग्णांना टॅमी फ्लु गोळ््या देण्यात आल्या. तर ३७ रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून १२ रुग्णांना लागण झाल्याचे तपासणीत आढळून आले.

       गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. गणेशोत्सवामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर गणेशभक्तांची गर्दी होते. स्वाईन फ्लु हा संसर्गजन्य आजार असल्याने या काळात हा आजार पसरण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक असल्याचे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे यांनी केले आहे.

स्वाईन फ्लुची लक्षणे -

ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला, सर्दी, अंगदुखी, डोकेदुखी.


अशी घ्या काळजी -

- स्वाईन फ्लुची लक्षणे असल्यास गर्दीत जाणे टाळा

- ताप, सर्दी, खोकला झाल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या

- मधमेह, हृदयरोग यांसारखे आजार असलेल्या व्यक्ती तसेच पाच वर्षाखालील मुले, गर्भवती महिलांनी अधिक काळजी घ्यावी

- हात वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने धुवावेत

- पौष्टिक आहार घ्या

- लिंबु, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्यांचा आहारात वापर करा

- भरपुर पाणी प्या

- शिंकताना, खोकताना नाका-तोंडावर रुमाल ठेवा

- सार्वजनिक ठिकाणी थुंकु नका

Web Title: Take care, these are symptoms and precaution of 'Swine flue'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.