बीएस 4 इंजिनचे वाहन घेताना 'ही' घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 06:26 PM2020-03-13T18:26:05+5:302020-03-13T18:27:23+5:30

बीएस 4 वाहनांची नाेंदणी 31 मार्चनंतर हाेणार नसल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन परिवहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

Take care of 'this' while buying a BS4 engine vehicle rsg | बीएस 4 इंजिनचे वाहन घेताना 'ही' घ्या काळजी

बीएस 4 इंजिनचे वाहन घेताना 'ही' घ्या काळजी

Next

पुणे : सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 31 मार्चनंतर बीएस 4 इंजिन प्रकारच्या वाहनांची नाेंदणी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. वाढत्या प्रदुषणाच्या पार्श्वभूमिवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नवीन गाडी घेताना त्या गाडीची नाेंदणी 31 मार्चपूर्वी हाेणे आवश्यक असून त्यानंतर काेणी बीएस 4 इंजिन प्रकारची गाडी खरेदी केल्यास तिची नाेंदणी हाेणार नसल्याचे पुण्याचे परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी स्पष्ट केले. 

वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमिवर सर्वाेच्च न्यायालयाने बीएस 4 इंजिन प्रकाराची वाहनांची नाेंदणी 31 मार्चनंतर करण्यास बंदी घातली आहे. सध्या बाजारात बीएस 6 प्रकारातील वाहने उत्पादित केली जात असून त्यांची विक्री केली जात आहे. बीएस 4 प्रकारातील वाहनांचे उत्पादन न करण्याचे आदेश यापूर्वीच कंपन्यांना देण्यात आले आहेत. दरम्यान ज्या डिलर्सकडे बीएस 4 कंपन्यांच्या वाहनांची स्टाॅक आहेत ते डिलर्स अशा गाड्या ऑफर देऊन विकत आहेत. परंतु या गाड्यांची नाेंदणी 31 मार्चच्या पूर्वी न झाल्यास त्या स्क्रॅप हाेणार आहेत, त्यामुळे नागरिकांनी वाहन खरेदी करताना खबरदारी घेण्याची गरज आहे. 

अजित शिंदे म्हणाले, बीएस 4 इंजिन असणाऱ्या वाहनाची नाेंदणी 31 मार्चपूर्वी हाेणार असेल तरच नागरिकांनी या इंजिन प्रकारचे वाहन खरेदी करावे. त्यामुळे शक्यताे 31 मार्चच्या एक आठवडापूर्वी वाहन खरेदी करावे, तसेच त्याची नाेंदणी 31 मार्चच्या आधी हाेईल याची खात्री करावी. 21 मार्चनंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय कुठलिही सुट्टी न घेता सुरु राहणार आहे. या काळात गाड्यांची नाेंदणी केली जाणार आहे. दरम्यान या काळात आरटीओचे सर्वर डाऊन झाल्यास किंवा इतर काही अडचणी आल्यास आणि वाहनाची नाेंदणी 31 तारखेच्या आत न झाल्यास आरटीओ जबाबदार राहणार नसल्याचेही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Web Title: Take care of 'this' while buying a BS4 engine vehicle rsg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.