एमपीएससीच्या संयुक्त पूर्वपरीक्षा लवकर घ्या, उमेदवारांची मागणी; वय वाढत असल्याने परीक्षांना अपात्र ठरण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 10:58 AM2021-06-09T10:58:14+5:302021-06-09T10:58:40+5:30

MPSC pre-exam : ११ एप्रिल रोजी होणारी संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पुढे ढकलण्यात आली होती. आता त्याचे नियोजन करून ती परीक्षा घेण्यास प्राधान्यक्रम देण्यात यावा, अशी मागणी एमपीएससी स्टुडंट राइट्स संघटनेकडून करण्यात आली आहे.

Take the joint pre-examination of MPSC early, demand of candidates; Fear of being disqualified from exams due to age | एमपीएससीच्या संयुक्त पूर्वपरीक्षा लवकर घ्या, उमेदवारांची मागणी; वय वाढत असल्याने परीक्षांना अपात्र ठरण्याची भीती

एमपीएससीच्या संयुक्त पूर्वपरीक्षा लवकर घ्या, उमेदवारांची मागणी; वय वाढत असल्याने परीक्षांना अपात्र ठरण्याची भीती

Next

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे. त्यामुळे एमपीएससीच्या रखडलेल्या परीक्षांबाबत आता शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षांची तारीख लवकर जाहीर करावी, अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे.

११ एप्रिल रोजी होणारी संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पुढे ढकलण्यात आली होती. आता त्याचे नियोजन करून ती परीक्षा घेण्यास प्राधान्यक्रम देण्यात यावा, अशी मागणी एमपीएससी स्टुडंट राइट्स संघटनेकडून करण्यात आली आहे. एमपीएससी परीक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव खूप असताना उमेदवारांच्या सुरक्षिततेसाठी पुढे ढकलण्यात आल्या. मात्र, आता कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असल्याने शासनाने परीक्षांबाबत निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे मत संघटनेचे सदस्य महेश बडे यांनी व्यक्त केले.

परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पाडली जावी, यासाठी आयोगाकडूनही तयारी करण्यात आल्याची माहिती समजल्याचे त्यांनी सांगितले. परीक्षा पुढे ढकलल्या जात असल्याने  उमेदवारांचे वय वाढत असून, ते परीक्षांना अपात्र ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. याचसोबत मानसिक ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक ताण, सामाजिक जबाबदाऱ्या अशा विविध कारणांना उमेदवारांना तोंड द्यावे लागत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Read in English

Web Title: Take the joint pre-examination of MPSC early, demand of candidates; Fear of being disqualified from exams due to age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.