विधान परिषदेसाठी आघाडी आमनेसामने

By admin | Published: August 12, 2014 03:08 AM2014-08-12T03:08:23+5:302014-08-12T03:08:23+5:30

जागेसाठी काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनीही अर्ज दाखल केल्याने सत्तारुढ आघाडीमधील मतभेद समोर आले.

Take the lead for the Legislative Council | विधान परिषदेसाठी आघाडी आमनेसामने

विधान परिषदेसाठी आघाडी आमनेसामने

Next

मुंबई : विधानसभेतून निवडून द्यावयाच्या विधान परिषदेच्या एका जागेकरता २१ आॅगस्ट रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करून सर्वांना धक्का दिला. याच जागेसाठी काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनीही अर्ज दाखल केल्याने सत्तारुढ आघाडीमधील मतभेद समोर आले. तर, शिवसेना-भाजपा युतीने उमेदवारच उतरविला नाही आणि लढाईआधी माघार घेतली.
तटकरे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन विधान परिषद निवडणुकीत आपण डमी उमेदवार नसल्याचे सांगितले. काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीच्या दबावतंत्रासमोर झुकेल आणि तटकरेंचा विधान परिषदेचा मार्ग मोकळा होईल किंवा काँग्रेसला राष्ट्रवादीने जागा सोडलीच तर विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात जास्त हिस्सा मागून घेतला जाईल, असे म्हटले जाते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १४ आॅगस्ट आहे. त्या दिवशी किंवा त्या आधी नेमके चित्र स्पष्ट होईल. काँग्रेसने यापूर्वी अनेकदा सहकार्य केलेले असताना राष्ट्रवादीने मात्र आडमुठेपणा कायम ठेवला आहे.
तटकरे हे कोकणातील श्रीवर्धन मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व विधानसभेत करतात. अलिकडे रायगड मतदारसंघातून ते अवघ्या काही मतांनी लोकसभेची निवडणूक हरले होते. या पार्श्वभूमीवर आता ते विधानसभेची निवडणूक पुन्हा लढवतील, असे म्हटले जात असताना सोमवारी त्यांनी अचानक विधान परिषदेची वाट धरल्याने (पान ९ वर)

Web Title: Take the lead for the Legislative Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.