इंटिग्रेटेड प्रवेशांची माहिती घ्या
By admin | Published: June 25, 2015 02:14 AM2015-06-25T02:14:53+5:302015-06-25T02:14:53+5:30
‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनची दखल घेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी संबंधित क्लास व कॉलेजच्या इंटिग्रेटेड प्रवेशांची माहिती घेण्याचे आदेश
Next
मुंबई : ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनची दखल घेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी संबंधित क्लास व कॉलेजच्या इंटिग्रेटेड प्रवेशांची माहिती घेण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत. याबाबत माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
रेझोनन्स, सिनॅप्स व सिन्हाल या खासगी क्लासेसमधून विद्यार्थ्यांना खोटी आश्वासने देऊन लाखो रुपये उकळले जात असल्याचे लोकमतने उघडकीस आणले होते. त्याची दखल घेत तावडे यांनी शिक्षण विभागाला हे आदेश दिले आहेत. विभागातील तांत्रिक बाबी तपासून पुढील कार्यवाहीचे आदेश देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.