'हव्या तेवढ्या यात्रा काढा; पण राजधर्म विसरू नका'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 03:44 AM2019-08-08T03:44:58+5:302019-08-08T06:19:36+5:30

अशोक चव्हाण यांचे आवाहन; शेतकऱ्यांना वाºयावर न सोडण्याचे आवाहन

'Take as many trips as you want; But Don't Forget Religion ' | 'हव्या तेवढ्या यात्रा काढा; पण राजधर्म विसरू नका'

'हव्या तेवढ्या यात्रा काढा; पण राजधर्म विसरू नका'

googlenewsNext

मुंबई : मते मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हव्या तेवढ्या यात्रा काढाव्यात. पण यात्रेच्या नादात राजधर्म विसरून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाºयावर सोडू नये. आणखी कोणत्याही शेतकºयावर धर्मा पाटील होण्याची दुर्दैवी वेळ आणू नये, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा अकोल्यात येण्याच्या आदल्याच दिवशी जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सरकारी अनास्थेमुळे या सहा शेतकऱ्यांना हे टोकाचे पाऊल उचलावे लागल्याने मुख्यमंत्री या सहा शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी इतक्या गंभीर घटनेची साधी दखलही न घेता अकोला दौरा आटोपता घेतला.

अकोल्यात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मुरलीधर राऊत यांचा समावेश होता. याच मुरलीधर राऊत यांनी नोटबंदीच्या काळात प्रवाशांकडे पैसे नसताना त्यांच्या विनाशुल्क जेवणाची व्यवस्था केली होती. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात त्यांचे जाहीर कौतूक केले होते. त्याच शेतकºयावर भाजप सरकारच्या काळात अनास्थेमुळे आत्महत्येची वेळ येते, हे लाजीरवाणे आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली आहे.

जमीन अधिग्रहणात योग्य मोबदला न मिळाल्यामुळे धुळे जिल्ह्यातील वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली होती. शेजारच्या जमिनीच्या मालकाचे मंत्र्याशी लागेबांधे आहेत म्हणून त्याला जास्त पैसे मिळाल्याची तक्रार धर्मा पाटील यांनी केली होती. तोच प्रकार अकोल्यात घडला आहे. ज्यांचे अकोल्याच्या पालकमंत्र्यांशी संबंध आहेत, त्यांना जमिनीचा जास्त मोबदला मिळाल्याचा आरोप तेथील शेतकरी करीत आहेत, असेही चव्हाण म्हणाले.

नांदेड जिल्ह्यातही अनेक शेतकºयांची हीच तक्रार आहे. हदगाव, अधार्पूर, लोहा तालुक्यातील शेतकºयांच्या जमिनी राष्ट्रीय महामार्गात गेल्या आहेत. त्यांना मिळालेला मोबदला अतिशय कमी आहे. वाढीव मोबदला मिळावा म्हणून ते शेतकरी आणि मी दोन वर्षांपासून पाठपुरावा करतो आहे. पण सरकारने अजून अंतिम निर्णय घेतलेला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Web Title: 'Take as many trips as you want; But Don't Forget Religion '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.