मुंबईचा आदर्श घ्या - हायकोर्ट
By Admin | Published: August 8, 2015 01:50 AM2015-08-08T01:50:03+5:302015-08-08T01:50:03+5:30
खड्ड्यांची तक्रार दाखल करण्यासाठी टोल फ्री नंबर व संकेतस्थळ तसेच खड्डे बुजवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, या मुंबई महापालिकेच्या धोरणाचे अनुकरण राज्यातील
मुंबई : खड्ड्यांची तक्रार दाखल करण्यासाठी टोल फ्री नंबर व संकेतस्थळ तसेच खड्डे बुजवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, या मुंबई महापालिकेच्या धोरणाचे अनुकरण राज्यातील इतर महापालिकांनीही करावे, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले.
मुंबईतील खड्ड्यांचा मुद्दा न्यायालयाने सुओमोटो जनहित याचिका म्हणून सुनावणीसाठी दाखल करून घेतला आहे. या याचिकेवर न्या. अभय ओक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यात राज्य शासनाने प्रतिज्ञापत्र सादर करून राज्यातील महापालिकांना खड्डे बुजवण्यासाठी धोरण आखण्याचे निर्देश दिल्याचे न्यायालयात स्पष्ट केले. मुंबई पालिकेनेही खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी टोल फ्री नंबर व संकेत स्थळ सुरू केले आहे; आणि खड्डे बुजवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारल्याचे न्यायालयाला सांगितले. त्याची नोंद करून घेत खंडपीठाने वरील आदेश दिले. यावरील पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे. (प्रतिनिधी)