गडकरींच्या जादूने नवी मुंबई विमानतळाचा ‘टेक ऑफ’

By admin | Published: July 24, 2014 02:19 AM2014-07-24T02:19:30+5:302014-07-24T02:19:30+5:30

देशाच्या नागरी विमान वाहतुकीसाठी महत्वाकांक्षी ठरणारा 14 हजार कोटी रूपयांचा नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ अवघ्या दोन तासांत सर्व अडथळयातून पार झाला!

'Take Off' of Navi Mumbai Airport with Gadkari's magic | गडकरींच्या जादूने नवी मुंबई विमानतळाचा ‘टेक ऑफ’

गडकरींच्या जादूने नवी मुंबई विमानतळाचा ‘टेक ऑफ’

Next
रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
देशाच्या नागरी विमान वाहतुकीसाठी महत्वाकांक्षी ठरणारा 14 हजार कोटी रूपयांचा नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ अवघ्या दोन तासांत सर्व अडथळयातून पार झाला! 
देशाच्या आजवरच्या इतिहासात इतक्या तडकाफडकी निर्णय क्वचितच घेण्यात आला असेल. ही जादूची छडी केंद्रीय भूपृष्ठवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने फिरली. कोणत्याही परिस्थितीत 2क्17 
अखेर  या विमानतळाच्या रन-वेवरून विमानाने उड्डाण केले पाहिजे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या,आणि तब्बल 
दहा वर्षापासून  रखडलेला आंतराष्ट्रीय निविदा काढण्याचा आदेश 
केंद्रीय विमान वाहतूक मंत्रलयाने जारी केला. 
आता,पुढच्या दोन दिवसात शहर व औद्योगिक विकास महामंडळाने (सिडको) आंतराष्ट्रीय निविदा  बोलवायच्या आहेत. त्याबाबतची तयारी नवी मुंबईतील सिडको कार्यालयात सुरू झाली आहे. 
नागरी स्थलांतर व  पुनर्वसन, तांत्रिकदृष्टय़ा परीक्षण, पर्यावण व वन विभागाच्या शेकडो परवानग्या अशा तीन टप्प्यांत हा विमानतळ प्रकल्प आंतराष्ट्रीय निविदा काढण्याच्या प्रतीक्षेसाठी तीन वर्षापासून रखडला होता. केंद्राकडे त्याबाबत पाठपुरावा सुरू होता. राज्य सरकार , सिडको व नागरी हवाई वाहतूक मंत्रलयाकडे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी पाठपुरावा केला. मुख्यमंत्री पृथ्वाराज चव्हाण यांनी हा विषय केंद्राकडे लावून धरला होता. मात्र अंतिम मान्यता काही केल्या मिळत नव्हती.
 मंगळवारी दुपारी सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक व्ही. राधा यांनी नितीन गडकरी यांच्याकडे विमानतळाबाबत सादरीकरण केले. त्यांनी किरकोळ दुरूस्त्या सांगितल्या, त्या राधा यांनी तात्काळ केल्या, आणि त्यानंतर लगेचच गडकरी यांनी 
केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांना सादरीकरण पाहा, आणि तात्काळ परवानगी द्या, असा आग्रह केला. त्याच दिवशी सायंकाळी पाच ते सात या वेळात गजपती राजू यांनी सादरीकरण पाहिले. काही सुधारणा केल्या, आणि तत्काळ  आंतराष्ट्रीय निविदा काढण्याची परवानगी दिली. विशेष म्हणजे, परवानगी दिल्याचे राजू यांनी गडकरी यांना तेव्हाच दूरध्वनी करून सांगितले. गडकरी हे पंतप्रधान अध्यक्ष असलेल्या केंद्रीय पायाभूत सुविधा समितीचे सदस्य आहेत.
 
निविदांचा विषय दोन तासांत मार्गी 
च्देशातील दहा मोठय़ा प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. दहा वर्षापासून रेंगाळलेला निविदांचा विषय अवघ्या दोन तासांत मार्गी लागला. दोन दिवसांत आंतराष्ट्रीय निविदा काढायच्या आहेत. 671 हेक्टर जागेवर आणि शहरातील 35क्क् घरांचे स्थलांतर करून हा प्रकल्प पूर्ण होत आहे. 2क्17 च्या अखेर रन-वेवरून विमाने उड्डाण करतील एवढी  तयारी करु, अशी प्रतिक्रिया सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक व्ही राधा यांनी व्यक्त केली.

 

Web Title: 'Take Off' of Navi Mumbai Airport with Gadkari's magic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.