...तर महाराजांची शपथ घेऊन सांगा, पारदर्शी कारभार केलाय म्हणून
By admin | Published: February 16, 2017 10:15 PM2017-02-16T22:15:49+5:302017-02-16T22:19:29+5:30
हिंम्मत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची शप्पथ घेऊन सांगा की,मुंबई महानगर पालिकेत 20वर्षे सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने भ्रष्टाचार केला नाही असे थेट आव्हान
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - हिंम्मत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची शप्पथ घेऊन सांगा की, मुंबई महानगर पालिकेत 20 वर्षे सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने भ्रष्टाचार केला नाही, असे थेट आव्हान केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांनी आज शिवसेनेला दिले. रात्री विलेपार्ले पूर्व येथील महिला संघाजवळील लक्ष्मी नारायण मैदानावर भाजपाच्या उमेवारांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. ही हिंमत शिवसेना दाखवणार नाही, राजकारण हे पैसे कमवण्याचे साधन नाही असे सांगून त्यांचे नगरसेवक आणि अधिकारी टक्केवारी गुंतले असल्याची टीका त्यांनी केली.
भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शी कारभार करण्यासाठी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा सर्वांगिण विकास करण्यासाठी भाजपाला मुंबई महानगर पालिकेत एकमुखी सत्ता द्या असे आवाहन त्यांनी केले.पालिका निवडणुकीतील प्रभाग क्र 80 चे उमेदवार सुनील यादव,प्रभाग क्र 83च्या उमेदवार पूर्णिमा माने,प्रभाग क्र 84चे उमेदवार अभिजित सामंत, प्रभाग क्र 85च्या भाजपा उमेदवार आणि विद्यमान नगरसेविका ज्योती अळवणी यांच्या प्रचारार्थ येथील आमदार पराग अळवणी यांनी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. सेनेवर टिकेचे आसूड ओढताना गडकरी पुढे म्हणाले की,गेली 25वर्षे भाजपाशी युती करून शिवसेना सोडली असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते.
मात्र युती मध्ये दोघांचाही फायदा झाला होता,भाजपा बरोबर युती नसती तर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला नसता असा टोला त्यांनी लगावला.नागपूर सारख्या शहराचा येथील महापालिकेत सत्तेत असणाऱ्या भा जपाने पारदर्शी कारभार केला असून, तो विकास शिवसेनेला गेल्या 20 वर्षात का जमला नाही असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला.त्यांनी यावेळी त्यांच्या दृष्टीक्षेपात असलेल्या जागतिक दर्जाच्या प्रकल्पाची माहिती देऊन अशा प्रकारचा जागतिक दर्जाचा विकास मुंबईत करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.