आमच्या वाटय़ाच्या जागा घ्या..
By admin | Published: September 20, 2014 02:13 AM2014-09-20T02:13:03+5:302014-09-20T02:13:03+5:30
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन, ‘आमच्या वाटय़ाच्या जागा घ्या, पण युती तुटू देऊ नका’ अशी विनंती केली.
Next
पुणो : शिवसेना आणि भाजपातील जागावाटपावरून झालेला दुरावा कमी करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी शुक्रवारी दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन, ‘आमच्या वाटय़ाच्या जागा घ्या, पण युती तुटू देऊ नका’ अशी विनंती केली.
जानकर यांनी ठाकरे यांच्यासमवेत सुमारे पाऊण तास चर्चा केली.
या बैठकीची माहिती देताना
जानकर म्हणाले, महायुती टिकावी अशी सामान्यांची इच्छा असून,
आघाडी सरकारची सत्ता घालविण्यासाठी एकत्र राहण्याची गरज असल्याचे आपण ठाकरे यांना सांगितले. माङया पक्षाच्या वाटय़ाच्या जागा घ्या, परंतु युती तोडू नका, अशी विनंती आपण ठाकरे यांना केली. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रवक्ते मोहन अडसूळ आदी बैठकीसाठी उपस्थित होते, अशी माहितीही त्यांनी दिली.
आपण भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि आमदार पंकजा मुंडे यांची भेट घेऊन त्यांनाही युती अबाधित ठेवण्याची विनंती करणार असल्याचे जानकर म्हणाले.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पुण्यात बालाजीनगरमध्ये सुरू होती. जानकर यांनी मात्र या बैठकीस न येता मुंबईतच थांबणो पसंत केले.