मोर्चे काढा, निषेध करा, पण जातीय द्वेष पसरवू नका !

By admin | Published: August 26, 2016 12:43 PM2016-08-26T12:43:18+5:302016-08-26T13:29:56+5:30

कोपर्डी प्रकरणाचा निषेध करण्यासाठी मराठा समाजाचा ३० आॅगस्टला बोड येथे मोर्चा निघत असेल तर त्याला आमचा पाठिंबा आहे, असे सांगत बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी सांगितले.

Take a protest, protest, but do not spread ethnic hatred! | मोर्चे काढा, निषेध करा, पण जातीय द्वेष पसरवू नका !

मोर्चे काढा, निषेध करा, पण जातीय द्वेष पसरवू नका !

Next
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. २६ -  कोपर्डी प्रकरणाचा निषेध करण्यासाठी मराठा समाजाचा ३० आॅगस्टला बोड येथे मोर्चा निघत असेल तर त्याला आमचा पाठिंबा आहे, असे सांगत बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी अशा मोर्चामधून जातीय द्वेष पसरवू नका, अशी विनंतीही मराठा समाजाला केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही एक पत्र लिहिले आहे.
 
अन्याय आणि अत्याचार हा काही जात पाहून होत नसतो. कोपर्डीची घटना अमानुष आणि निंदनीयच आहे. यासाठी आम्ही दलित संघटनेच्या वतीने या प्रकरणातील दोषींवर कडक करवाई करावी, अशी मागणी केली आहे. मराठा समाजाचा मुक मोर्चा निघणार असेल तर त्याला आमचा विरोध नाही. परंतु यातून जातीय तेढ निर्माण होणार नाही, याची काळजीही त्यांनी घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले. 
 
अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट रद्द करण्याची मागणी चुकीची असून या कायद्याची प्रभावी अमंलबजावणी करणे आवश्यक आहे, असे सांगत बाबुराव पोटभरे म्हणाले, या कायद्याची अमलबजवाणी करण्यासाठी नोडल आॅफिसरची नियुक्ती करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.
 
 

Web Title: Take a protest, protest, but do not spread ethnic hatred!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.