पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पुरंदर तालुक्यातून ‘टेक आॅफ’

By admin | Published: September 23, 2016 09:49 PM2016-09-23T21:49:22+5:302016-09-23T21:49:22+5:30

स्मार्ट पुण्यासाठीचे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील राजेवाडी, वाघापूर येथील जागा निश्चित झाली असून, येत्या आठ दिवसांत महाराष्ट्र विमानतळ

'Take Off' from Purandhar taluka of Pune International Airport | पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पुरंदर तालुक्यातून ‘टेक आॅफ’

पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पुरंदर तालुक्यातून ‘टेक आॅफ’

Next
dir="ltr">
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 23 - स्मार्ट पुण्यासाठीचे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील राजेवाडी, वाघापूर येथील जागा निश्चित झाली असून, येत्या आठ दिवसांत महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या कोर कमिटीच्या बैठकीत या जागेबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.
विभागातील विविध शासकीय योजनेबाबतच्या कामांचा आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पुण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागे संदर्भांत फडणवीस यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, पुण्यासाठी आंतराष्ट्रीय विमानतळासाठी एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या पथकाने खेड तालुक्यातील जागेची दोन वेळा पाहणी करून ही जागा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी योग्य असलेचे पत्र चार दिवसांपूर्वीच मला दिले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प मार्गी लागण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, येथील लोकांचा देखील या प्रकल्पासाठी सकारात्मक प्रतिसाद आहे. यामुळे येत्या आठ दिवसांत महाराष्ट्र विमानतल विकास प्राधिकरणाच्या कोर कमिटीची बैठक घेऊन पुरंदरच्या जागेवर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. या बैठकीनंतर या जागेसाठी शेतक-यांना काय पॅकेज द्यायचे, प्रकल्पाची कालमर्यादा काय असेल किती जागा घ्यावी लागेल आदी सर्व गोष्टींचे सूक्ष्म नियोजन करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी येथे सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे गेल्या पंधरा वर्षांपासून केवळ चर्चेचा विषय ठरलेल्या पुण्यासाठीच्या आंतराष्ट्रीय विमानतळ अखेर लवकरच टेक आॅफ घेण्याची आशा निर्माण झाली आहे. या विमानतळामुळे पुणे जिल्ह्यातील औद्योगिक विकासा बरोबरच नाशिक, नगर, सांगली, सोलापूर कृषी विकासाला चालना मिळणार आहे.

Web Title: 'Take Off' from Purandhar taluka of Pune International Airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.