राज्यात त्वरित निवडणुका घ्या

By admin | Published: May 18, 2014 12:57 AM2014-05-18T00:57:34+5:302014-05-18T00:57:34+5:30

आघाडी सरकारने राजीनामा देत निवडणुकीला सामोरे जावे, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

Take quick elections in the state | राज्यात त्वरित निवडणुका घ्या

राज्यात त्वरित निवडणुका घ्या

Next
>प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची मागणी 
 
मुंबई : राज्यातील जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला साफ नाकारल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जनभावनेचा आदर करीत आघाडी सरकारने राजीनामा देत निवडणुकीला सामोरे जावे, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. 
15 वर्षे सत्ता गाजविणा:यांची जनतेशी नाळ तुटली आहे. त्यांच्या उक्ती आणि कृतीतून सत्तेचा अहंकार व्यक्त होत होता. त्यामुळेच महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हे इतका दारुण पराभव काँग्रेसच्या वाटय़ाला आल्याचे फडणवीस म्हणाले. आगागी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा ‘पॉङिाटिव्ह अजेंडा’ घेऊन उतरणार आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणोच विधानसभा निवडणुकीतही लोकांचा कौल मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. 2क्क्9 च्या निवडणुकीत भाजपाला 7क् लाख मते मिळाली होती. यंदा 1 कोटी 53 लाख मते मिळाल्याचे फडणवीस म्हणाले. नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली 19 मे रोजी राज्यातील भाजपाच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक होत आह़े संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर नवनिर्वाचित पंतप्रधानांना भेटून गारपीटग्रस्तांच्या मदतीस साकडे घालणार असल्याचे फडणवीस म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Take quick elections in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.