।। घ्या रे भोकरे भाकरी ।। ।। दही भाताची शिदोरी ।।
By admin | Published: June 26, 2014 10:24 PM2014-06-26T22:24:17+5:302014-06-26T22:24:17+5:30
श्री संत तुकोबारायांच्या अभंगातील शिदोरीचा खराखुरा आनंद लुटत सह्याद्रीच्या पर्वतरांगांतून मार्गक्रमण करीत आज माऊलींचा सोहळा सकाळच्या न्याहारीसाठी दौंडज खिंडीत पोहोचला.
Next
।। घ्या रे भोकरे भाकरी ।।
।। दही भाताची शिदोरी ।।
जेजुरी : श्री संत तुकोबारायांच्या अभंगातील शिदोरीचा खराखुरा आनंद लुटत सह्याद्रीच्या पर्वतरांगांतून मार्गक्रमण करीत आज माऊलींचा सोहळा सकाळच्या न्याहारीसाठी दौंडज खिंडीत पोहोचला.
खिंडीच्या चहूबाजूच्या उघडय़ा बोडक्या पर्वतरांगांच्या पायथ्याशी सोहळा न्याहरीसाठी विसावला. दर वर्षी हिरवागार दिसणारा हा डोंगर पावसाने ओढ दिल्याने ओसाड दिसत होता. पावसाची चेह:यावरील चिंता आणि पांडुरंगाची ओढ या संमिश्र भावना प्रत्येक वारक:याच्या चेह:यावर दिसत होती. सोहळ्यापूर्र्वी पाऊस नाही झाला, तरी सोहळा सुरू झाल्यानंतर पाऊस येतोच, हा अनुभव वर्षानुवर्षे घेतलेल्या वैष्णवांच्या चेह:यावर चिंता स्पष्ट दिसत होती. पांडुरंग नाराज करणार नाही, याच अपेक्षेने वारी सुरू होती. पावसाने ओढ दिल्यामुळेच सोहळ्यातील वारक:यांची संख्या अगदी निम्म्यावर आलेली दिसत होती.
दौंडज खिंडीत कोळविहिरे आणि दौंडज परिसरातील शेतकरी भाविकांनी दिलेली न्याहारी वैष्णव घेत होते. कोळविहिरे येथील भोरवाडी येथील काही सामाजिक संस्थांनी ही अन्नदानाची सुविधा केली होती. न्याहरी घेतानाच चवी चवी घेऊ घास ..ब्रrा रस आवडी.. अशा ओव्यांचे सूर ऐकावयास येत होते.
न्याहारी उरकून 9.3क् वाजता सोहळ्याने वाल्ह्याकडे कूच केली. 11 वाजण्याच्या सुमारास सोहळा दौंडज येथे विसाव्यासाठी पोहोचला. अध्र्या तासाच्या विसाव्यात परिसरातील कवडेवाडी, पिंगोरी, दौंडजच्या वाडय़ावस्त्यावरील आबालवृद्धांनी माऊलींचे दर्शन घेतले. दुपारचा नैवेद्य आणि भोजनासाठी सोहळा वाल्हय़ाकडे मार्गस्थ झाला.
महर्षी वाल्मीकी ऋषींच्या तपोभूमीत माऊली
नीरा : विश्वाला एकता, समता आणि बंधुभावाचा संदेश देत आषाढी वारीसाठी निघालेला श्री ज्ञानराज माऊलींचा पालखी सोहळा वाल्हेनगरीत मुक्कामी विसावला.