संपूर्ण कर्जमुक्तीसाठी ‘रूम्हणे’ हातात घ्या-मुंढे
By Admin | Published: July 5, 2016 01:12 AM2016-07-05T01:12:44+5:302016-07-05T01:12:44+5:30
बुलडाणा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात विरोधीपक्ष नेते मुंढे यांनी शेतक-यांना आवाहन केले.
बुलडाणा : शेतकर्यांकडे पाहण्यासाठी राज्य व केंद्र सरकारला वेळ नाही. लोकसभेच्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. यावेळी मतदारांना दाखविण्यात आलेले स्वप्ने खोटी होती. ही स्वप्ने खोटी असल्यामुळे पूर्ण होणारी नाहीत. अशी खोटी स्वप्ने दाखविणार्या विरूध्द व संपूर्ण कर्जमुक्तीसाठी हातात रूम्हणे घ्या, असे आवाहन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकर्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी २५ हजार शेतकर्यांच्या सह्या असलेले निवेदन स्विकारण्यासाठी ४ जुलै रोजी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे,जिल्हाध्यक्ष अँड. नाझेर काझी, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नरेश शेळके, अँड.साहेबराव सरदार आदींची उपस्थिती होती. , यावेळी धनंजय मुंढे पुढे म्हणाले की, जनतेला पर्याय हवा होता आणि एक व्यक्ती देशाला फसवित होती. यावेळी त्याने दाखविलेली स्वप्ने खोटी होती. मात्र निवडणुकीनंतर भाजपाने दाखविलेली स्वप्ने, घोषणा हवेत विरली. राज्य सरकारने राज्यातील २४ नगरपालिकेतील १७ हजार व्यापार्यांचा ३ हजार कोटीचा एलबीटी माफ केला आहे. या सरकारच्या १७ महिन्याच्या काळात ८ मंत्र्यांनी घोटाळे केले आहेत. सरकारला येणार्या पावसाळी अधिवेशनात शेतकर्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी धारेवर धरणार असल्याचे सांगून आपला हक्क मिळविण्यासाठी त्यांना रस्त्यावर फिरू देऊ नका, रूम्हणे हातात घेवून सळो की, पळो करून सोडा असे आवाहन त्यांनी केले.
'वर्षा'वर गाय घेऊन जाणार!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, की आम्ही शेतकरी विरोधी नाही, मी पाच पिढय़ांचा शेतकरी आहे. मलाही गाईचे दूध काढता येते, मात्र फक्त बसण्याची अडचण आहे. मी येणार्या काळात वर्षा बंगल्यावर गाय घेऊन जाणार आहे. त्यांना बसणे नाही म्हणून टेबलावर गाय उभी करुन मुख्यमंत्र्यांकडून दुध काढून घेणार असल्याचे मुंढे यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हंशा पिकला होता.