परीक्षा एप्रिलमध्ये घ्या; निकाल ‘मे’मध्ये लावा; शिक्षण विभागाचे वरातीमागून घोडे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 09:35 AM2022-03-25T09:35:48+5:302022-03-25T09:36:01+5:30

राज्यात अनेक शाळांच्या परीक्षा संपत असून पालकांनी आपापल्या गावी जाण्याची तिकिटेही आरक्षित केली आहे. मात्र आता शिक्षण विभागाने गुरुवारी पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Take the exam in April; declare result in 'May' | परीक्षा एप्रिलमध्ये घ्या; निकाल ‘मे’मध्ये लावा; शिक्षण विभागाचे वरातीमागून घोडे

परीक्षा एप्रिलमध्ये घ्या; निकाल ‘मे’मध्ये लावा; शिक्षण विभागाचे वरातीमागून घोडे

googlenewsNext

मुंबई : राज्यातील अनेक शाळांनी पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा सुरू केल्या असताना परीक्षा एप्रिलमध्ये घ्या आणि निकाल मे महिन्यात लावा, असे अजब परिपत्रक गुरूवारी शिक्षण मंडळाने जारी केले. शिक्षण विभागाचे हे वरातीमागून घोडे असल्याची टीका होत आहे. 

राज्यात अनेक शाळांच्या परीक्षा संपत असून पालकांनी आपापल्या गावी जाण्याची तिकिटेही आरक्षित केली आहे. मात्र आता शिक्षण विभागाने गुरुवारी पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मे महिन्यात निकाल जाहीर करावेत, असेही निर्देशित केले आहे. राज्यात २४ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासन आणि महापालिकांना शालेय शिक्षण विभागाने दिले होते. त्यानंतर आता राज्यात पहिली ते नववी आणि आणि अकरावीचे वर्ग पूर्णवेळ एप्रिलअखेर सुरू ठेवण्याच्या सूचना शिक्षण विभागाने गुरूवारी दिल्या आहेत. 

शिक्षण क्षेत्रातून प्रचंड विरोध 
दरवर्षी पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत होऊन एप्रिल महिन्यात त्यांचे निकाल जाहीर केले जातात. यंदा शालेय शिक्षण विभागाकडून परीक्षांच्या बाबतीत काहीच सूचना न आल्याने अनेक जिल्ह्यातील शाळांनी परीक्षांना सुरुवात केली आहे. 
अनेक शाळांच्या तर परीक्षाही झाल्या आहेत. त्यामुळे आताच्या परिपत्रकामुळे परीक्षा सुरू न झालेल्या शाळांनी करायचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एप्रिलमध्ये परीक्षा घेण्यास पालकांचाही विरोध आहे.

रविवारी शाळा भरवण्याची सूचना
nकोरोना काळातील विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी शाळांनी शनिवारी पूर्णवेळ वर्ग सुरू ठेवून ऐच्छिक स्वरूपात रविवारीही वर्ग सुरू ठेवता येतील, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
nएप्रिलअखेर किंवा तिसऱ्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन मे महिन्यात निकाल जाहीर करावेत, असेही शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या १०० टक्के उपस्थितीस शिक्षण विभागाने परवानगी दिली.

Web Title: Take the exam in April; declare result in 'May'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.