‘त्या’ बाजार समित्यांच्या निवडणुका तत्काळ घ्या!
By admin | Published: October 6, 2015 02:00 AM2015-10-06T02:00:33+5:302015-10-06T02:00:33+5:30
राज्य सरकारने बाजार समित्यांच्या निवडणुकांना मुदतवाढ दिल्याने २ बाजार समित्यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने
पुणे : राज्य सरकारने बाजार समित्यांच्या निवडणुकांना मुदतवाढ दिल्याने २ बाजार समित्यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने या बाजार समित्यांवर प्रशासक कायम ठेवले आहेत. मात्र, तत्काळ निवडणुका घेण्याचा आदेश दिला आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे २२ जानेवारीपर्यंत बाजार समित्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे ज्या समित्यांची मुदत संपली तेथे प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. याविरोधात कडा (जि. बीड) व शिरपूर (धुळे) या बाजार समित्यांचे संचालक न्यायालयात गेले होते. एकतर संचालक मंडळाला मुदतवाढ द्या, अथवा तत्काळ निवडणुका घ्या, अशी भूमिका घेत या संचालक मंडळाने प्रशासक नियुक्त करण्यास विरोध केला होता.
न्यायालयाने प्रशासक रद्द करण्याची मागणी मान्य केलेली नाही; परंतु या दोन समित्यांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले असल्याचे पणन विभागाचे प्रभारी संचालक किशोर तोष्णीवाल यांनी सांगितले. राज्य सरकारने समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलल्याने सध्या तीसहून अधिक समित्यांवर प्रशासक आहेत.