तीन मिनिटातच टोल घ्या - जिल्हाधिकारी

By Admin | Published: June 17, 2016 08:19 PM2016-06-17T20:19:16+5:302016-06-17T20:27:09+5:30

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर होणारी सततची वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी एक उपया म्हणून सर्व टोल नाक्यांवर होणार विलंब टाळण्यासाठी प्रवाशांकडून तीन मिनिटातच टोल घेण्याच्या सचूना

Take tolls in three minutes - Collector | तीन मिनिटातच टोल घ्या - जिल्हाधिकारी

तीन मिनिटातच टोल घ्या - जिल्हाधिकारी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १७ : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर होणारी सततची वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी एक उपया म्हणून सर्व टोल नाक्यांवर होणार विलंब टाळण्यासाठी प्रवाशांकडून तीन मिनिटातच टोल घेण्याच्या सचूना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिल्या आहेत. यासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाय-योजना त्वरीत पूर्ण करण्यास महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि आयआरबी या कंपनीच्या अधिका-यांना त्यांनी सांगितले आहे.


जिल्ह्यातील विविध रस्त्यांवरील वाहतुकींच्या प्रश्नांबाबात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी वाहतूक विभागाचे उपायुक्त प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील उपस्थित होत. या बैठकीत दु्रतगती मार्गावरही टोल नाक्यावर पावती मिळण्यासाठी जास्त वेळ वाट पाहावी लागते अशा अनेक तक्रारी नागरिकांनी जिल्हाधिका-यांकडे आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दु्रतगती मार्गावर देखील टोल नाक्यावर तीन मिनिटापेक्षा जास्त कालावधी प्रवाशांना थांबावे लागू नये अशी यंत्रणा विकसित करा. अन्यथा जिल्हा प्रशासनाला दु्रतगती मार्गावरील टोलनाक्यांवर खेड-शिवापूर येथील टोल नाक्यावर करण्यात आलेल्या उपाययोजनांसारखी यंत्रणा उभारावी लागले, अशा स्पष्ट सूचना राव यांनी दिल्या.


याबाबत राव यांनी सांगितले की, पुणे-मुंबई महामार्गावर गेल्या काही दिवसांत अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अपघात होण्यास मानवी चुकांबरोबरच पायाभूत सुविधांचा अभावाचे कारण असू शकते. महामार्गावर अनेक ठिकाणच्या जाळ््या तुटल्या आहेत. त्यामुळे मार्गावर जनावरे येतात. अचानक समोर आलेल्या जनावारांमुळे अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्याच बरोबर अलिकडे या मार्गावर दुचाकीस्वारही प्रवास करीत असतात. त्यामुळेही अपघात होतात. वास्तविक या मार्गावर येणा-या दुचाकीस्वारांवर कारवाई करावी, असे राव यांनी सांगितले.

दरम्यान जिल्ह्यातील विविध रस्त्यांवरील वाहतुकींच्या प्रश्नांबाबत स्वतंत्र बैठका घेतल्या जातात. परंतु यापुढे रस्ते सुरक्षा आणि वाहतूक याबाबत सर्व संबंधित घटकांची एकत्रित बैठक घेण्यात यावी, असे राव यांनी परिवहन विभागाला सांगितले. तसेच पालखी मार्गावरील अतिक्रमणे काढण्यासाठी मोहिम, रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे गतिने करा. बैठकीसाठी लोहमार्ग पोलीस एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Take tolls in three minutes - Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.