सहकाराचे रण तापणार

By admin | Published: January 21, 2015 02:15 AM2015-01-21T02:15:24+5:302015-01-21T02:15:24+5:30

आजवर या ना त्या कारणाने रखडलेल्या २० जिल्हा बँकांसह राज्यातील तब्बल २६ हजार ९५८ सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सुरू केली

Taking the co-operation | सहकाराचे रण तापणार

सहकाराचे रण तापणार

Next

बिगुल : २० जिल्हा बँका, २६ हजार ९५८ सहकारी संस्थांची निवडणूक प्रकिया सुरू
पुणे : आजवर या ना त्या कारणाने रखडलेल्या २० जिल्हा बँकांसह राज्यातील तब्बल २६ हजार ९५८ सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सुरू केली असून, जूनमध्ये राज्य सहकारी बँकेची निवडणूक घेण्यात येणार आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त मधुकर चौधरी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँॅकांपैकी रायगड, सोलापूर, जालना, अमरावती, भंडारा, गोंदिया व चंद्रपूर या बँकांच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली नाही. वर्धा, नागपूर आणि बुलडाणा या बँकांवर प्रशासक आहे. तर यवतमाळ बँकेसंदर्भात उच्च न्यायालयात दावा सुरू आहे. त्यामुळे या बँका वगळून इतर बँकांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. निवडणूक प्रक्रिया मे महिनाअखेर पूर्ण करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

जिल्हा बँकेला मतदान करण्यासाठी एकाच संस्थेचे दोन ठराव आल्यास, प्राधिकरणाला चुकीची माहिती दिल्यास अथवा मतदार यादीत खाडाखोड केल्यास संबंधित संस्थेवर कलम १४६ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल. त्यात १५ हजार रुपये दंड व तीन वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. तसेच बँकेच्या प्रत्येक शाखेत मतदान केंद्र असेल.

या बँकांच्या निवडणुका़़़
मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे-नंदुरबार, जळगाव, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, परभणी, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अकोला, गडचिरोली़

Web Title: Taking the co-operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.