तलत आझीझ यांना ‘प्राइड ऑफ प्लॅनेट’ पुरस्कार
By admin | Published: July 8, 2017 05:04 PM2017-07-08T17:04:19+5:302017-07-08T17:04:19+5:30
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यता प्राप्त डॉ पचलोरे फांऊडेशन दिला जाणारा ‘प्राईड ऑफ प्लॅनेट’ पुरस्कार संगितकार तलत अझीज दिला जाणार आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
अमरावती, दि. 8 - येथील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यता प्राप्त डॉ पचलोरे फांऊडेशन दिला जाणारा ‘प्राईड ऑफ प्लॅनेट’ पुरस्कार संगितकार तलत अझीज दिला जाणार आहे.
सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय , साहित्य, कला, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. संस्थेच्या प्रेरणा दिवसाचे औचित्य साधून नागपूर येथील चिटणवीस सेंटर येथे आयोजित केण्यात आलेल्या सोहळ्यात २० जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाईल. ही माहिती फाऊंडेशनच्या संजीवनी पचलोरे यांनी दिली.
संगीतकार गायक व अभिनेता उस्ताद तलत अझीझ हे किराणा घराण्याचे गायक असून त्यांनी मेहंदी हसन व जगजीत सिंग यांच्याकडून गायनाचे धडे घेतले आहेत. त्यांचे ३० हून अधिक गाण्यांचे अल्बम प्रसिद्ध आहेत.
यापूर्वी हा पुरस्कार युरोपिन कौन्सिल पोलंडच्या संचालक जुस्त्याना कृकोव्स्का, माजी आमदार डॉ. देविसिंह शेखावत, नीरीचे संचालक डॉ . सतीश वटे, अभिनेता डॉ. मोहन आगाशे, रविंद्र जाधव, आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश, सिम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ लोकेंद्रसिंह यांना प्राईड ऑफ प्लॅनेट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. पचलोरे फाऊं डेशनच्या ‘एटीएम’ (एनी टाईम मदत) केंद्राच्या मदतीने आत्महत्येपासून परावृत केले जाते.