पुनर्वसनासंदर्भात गावकऱ्यांशी चर्चा
By Admin | Published: May 11, 2015 04:45 AM2015-05-11T04:45:57+5:302015-05-11T04:45:57+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी रविवार संग्रामपूर तालुक्यातील अंबाबारवा गावाला अचानक भेट दिली़
बुलडाणा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी रविवार संग्रामपूर तालुक्यातील अंबाबारवा गावाला अचानक भेट दिली़ या भेटीत परदेशी यांनी गावांच्या पुनर्वसनाबाबत आदिवासी बांधवांशी चर्चा केली़ या भेटीत गावकऱ्यांच्या तक्रारीवरून चुनखेडी व अंबाबारवा येथील चार शिक्षकांना तडकाफडकी निलंबित केले असल्याचे वृत्त आहे़
आरक्षित वनक्षेत्रातील गावांच्या पुनर्वसनासंदर्भात महिती घेण्यासाठी ते येथे आले होते़ आदिवासी गावातील शैक्षणिक व्यवस्थेबद्दल गावकऱ्याकडून माहिती घेतली असता, येथे आठ ते पंधरा दिवसातून एक वेळ शिक्षक येतात, अशी माहिती त्यांना मिळाली़ त्यांनी लगेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला आणि अंबाबारवा व चुनाखेडी येथील शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले़ त्यावरून मुधोळ यांनी येथील चार शिक्षकांना तडकाफडकी निलंबित केले़ (प्रतिनिधी)