मुंबईत साकारणार बुर्ज खलिफापेक्षाही उंच इमारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2017 02:29 PM2017-04-16T14:29:41+5:302017-04-16T15:06:37+5:30

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत दुबईच्या बुर्ज खलिफापेक्षाही मोठी आणि अलिशान इमारत बांधण्यात येणार

The tall building that is built in Mumbai, is more than the Burj Khalif | मुंबईत साकारणार बुर्ज खलिफापेक्षाही उंच इमारत

मुंबईत साकारणार बुर्ज खलिफापेक्षाही उंच इमारत

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई , दि. 16 - देशाची आर्थिक राजधानी मुंबईत दुबईच्या बुर्ज खलिफापेक्षाही मोठी आणि अलिशान इमारत बांधण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली. याबाबत योजना तयार असून केवळ कॅबिनेटच्या मंजुरीची वाट पाहत आहोत असं गडकरी म्हणाले.
 
गडकरींच्या या ड्रीम प्रोजेक्टपर्यंत पोहोचण्यासाठी मरीन ड्राइव्हपेक्षाही मोठा रस्ता तयार केला जाईल. या रस्त्याच्या दुतर्फा झाडं असणार आहेत. वृत्तसंस्था पीटीआयसोबत बोलताना गडकरी म्हणाले, मुंबईत आमच्याकडे सर्वात जास्त जमीन आहे. प्रसिद्ध ताज होटल, बलार्ड एस्टेट, रिलायन्स बिल्डिंग यांचे आम्ही  (मुंबई पोर्ट ट्रस्ट)मालक आहोत. बंदराला लागून असलेली जमीन विकसित करणार आहोत.ही योजना अत्यंत चांगली असून या योजनेसाठी केंद्र सरकारकडून हिरवा कंदील येण्याची वाट पाहत आहोत. 
 
ही जमीन आम्ही कंत्राटदार किंवा गुंतवणूकदारांना देणार नाही. येथील परिसराचा विकास करण्याची योग्य योजना आमच्याकडे आहे.  मरीन ड्राइव्हपेक्षाही मोठा  आणि ग्रीन, स्मार्ट रस्ता बनवणार आहोत. बुर्ज खलिफापेक्षाही भव्य ऐतिहासीक इमारत बांधण्याची आमची योजना आहे. प्लॅन तयार असून केवळ कॅबिनेटच्या मंजुरीची आवश्यकता आहे. 

Web Title: The tall building that is built in Mumbai, is more than the Burj Khalif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.