देशातील महामार्गावरील सर्वात उंच केबल-स्टेड ब्रिज महाराष्ट्रात बनणार; ६ किमी अंतर कमी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 09:02 AM2022-09-30T09:02:35+5:302022-09-30T10:37:45+5:30

नवीन लिंकरोडमुळे अपघात कमी होण्यासोबतच इंधन कार्यक्षमता सुधारण्यास आणि वायूचे उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल

Tallest cable-stayed bridge on a highway in the country to be built in Maharashtra on Mumbai Pune Express Way | देशातील महामार्गावरील सर्वात उंच केबल-स्टेड ब्रिज महाराष्ट्रात बनणार; ६ किमी अंतर कमी होणार

देशातील महामार्गावरील सर्वात उंच केबल-स्टेड ब्रिज महाराष्ट्रात बनणार; ६ किमी अंतर कमी होणार

googlenewsNext

मुंबई - भारतातील सर्वात उंच केबल-स्टेड रोड ब्रिज महाराष्ट्रात बांधला जात आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग मिसिंग लिंक प्रकल्पातील पायाभूतसुविधा क्षेत्रातील प्रमुख कंपनी अफकॉन्सद्वारे हा १३२ मीटर उंच पूल बांधला जात आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या मुंबई पुणे द्रुतगती मार्गाची खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्यूटपर्यंतची लांबी सुमारे १९ किलोमीटर आहे. मिसिंग लिंक प्रकल्प खंडाळा घाट विभागाला बायपास करेल त्यामुळे एक्सप्रेसवेचे अंतर सहा किलोमीटरहून कमी होईल आणि २५ मिनिटांहून अधिक प्रवासाचा वेळ वाचेल 

महामार्गावरील सर्वात उंच केबल-स्टेड ब्रिज 
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मिसिंग लिंक प्रकल्प दोन पॅकेजमध्ये विभागलेला आहे. अफकॉन्स पॅकेज-दोन चे काम करत असून यात विद्यमान द्रुतगती मार्गाचे सहा लेनवरून आठ लेनपर्यंत रुंदीकरण, दोन व्हायाडक्‍ट (उड्डाणपूल), त्यापैकी एका व्हायाडक्‍टमध्ये केबल-स्टेड ब्रिज, यासह इतर कामांचा समावेश आहे. सुमारे ८५० मीटर लांबीच्या व्हायाडक्ट-I साठी फाउंडेशनचे पूर्ण झाले आहे आणि प्री-टेन्शन गर्डर्स आणि डेक पॅनेलचे लॉन्चिंग प्रगतीपथावर आहे. व्हायाडक्ट -II, जेथे केबल-स्टेड पूल बांधला जात आहे तो सुमारे ६५० मीटर लांब आहे. हा पूल जमिनीपासून १३२ मीटर उंचीवर असेल जो देशातील कोणत्याही रस्ते प्रकल्पामधील सर्वात उंच असेल.

“सध्या, व्हायाडक्ट-II मध्ये  फाउंडेशन, पिलर आणि पायलॉन (केबल स्टेड ब्रिज पिलर)  बांधण्याचे काम सुरू आहे.  या व्हायाडक्टमधील सर्वात उंच पायलॉन जमिनीच्या पातळीपासून १८२ मीटर असेल आणि हा भारतातील कोणत्याही कोणत्याही रस्ते प्रकल्पातील सार्वधिक उंच असेल,” असे अफकॉन्सचे प्रकल्प व्यवस्थापक रणजित झा यांनी सांगितले. त्याचसोबत खंडाळा घाट हा भूस्खलन आणि अपघातप्रवण भाग आहे. नवीन लिंकरोडमुळे अपघात कमी होण्यासोबतच इंधन कार्यक्षमता सुधारण्यास आणि वायूचे उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल असंही त्यांनी म्हटलं. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मिसिंग लिंक प्रकल्पाच्या पॅकेज-II चे काम २०१९ मध्ये सुरू झाले आणि ते २०२४ मध्ये पूर्ण होईल.

रुंदीकरणासाठी ब्लास्टिंग आव्हानात्मक
प्रकल्पाला विविध भूवैज्ञानिक, वाहतूक आणि अत्यंत अभियांत्रिकी आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. सध्याच्या एक्स्प्रेस वे चे सहा लेनवरून आठ लेनपर्यंत रुंदीकरण करण्यासाठी दिलेल्या वेळेमध्ये टेकडी तोडण्यासाठी ब्लास्टिंग करावे लागते. ब्लास्टिंग दरम्यान, केवळ वाहतूकच नाही तर ब्लास्टिंग ठिकाणांजवळील काम देखील थांबवले जाते. मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री ब्लास्टिंग प्रभाव क्षेत्रापासून सुरक्षित ठिकाणी हलवली जाते. द्रुतगती मार्गावरील अवजड वाहतुकीदरम्यान सामग्रीची वाहतूक आणि गर्डरचे स्थलांतर हीसुद्धा टीमसमोरील इतर काही आव्हाने आहेत.

पॅकेज-II ची वैशिष्ट्ये- 
५.८६ किमी  सध्याच्या द्रुतगती मार्गाचे रुंदीकरण 
१०.२ किमी अप्रोच रस्त्यांचे बांधकाम 
१३२ मीटर उंच केबल-स्टेड ब्रिजचे बांधकाम 
केबल-स्टेड ब्रिजमध्ये १८२M चा उंचीचा सर्वात उंच पायलॉन

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Tallest cable-stayed bridge on a highway in the country to be built in Maharashtra on Mumbai Pune Express Way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.