पुणे विभागातील अकरा लाख नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 12:26 PM2019-09-18T12:26:47+5:302019-09-18T12:27:10+5:30

पुणे विभागातील कोल्हापूर वगळता उर्वरीत जिल्ह्यात टँकर सुरु आहेत...

Tanker water supply to eleven lakh citizens of Pune region | पुणे विभागातील अकरा लाख नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा

पुणे विभागातील अकरा लाख नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा

googlenewsNext
ठळक मुद्देसाडेचार लाख पशूधन बाधित : जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदरमधे टॅँकर सुरुच

पुणे : पश्चिम महाराष्ट्रत जोरदार पाऊस बरसूनही पुणे, सातारा, सांगलीसह सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ११ लाख २८ हजार ७६५ नागरिकांना ८८६ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. विभागातील ५०१ गावे आणि ३,१४७ वाड्या व ४ लाख ६० हजार ९८८ पशूधनाला पाणी टंचाईची झळ बसली आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर व आंबेगाव तालुक्यातील १ लाख ९७८ लोकसंख्येला ५० टँकरने पाणी पुरविले जात असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाच्या वतीने देण्यात आली. 
पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर झालेल्या जोरदार पावसामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यातही पूरस्थिती निर्माण झाली होती. लाखो नागरिकांचे स्थलांतर करावे लागले. सोलापूर जिल्ह्यात पाऊस कमी झाला असला तरी जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेले उजनी धरणात ११७.४७ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला. धरण पूर्णक्षमतेने भरल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पाणी सोडून दिल्याने पंढरपूरसह काही तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. 
पुणे विभागातील कोल्हापूर वगळता उर्वरीत जिल्ह्यात टँकर सुरु आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूरमधे पावसाची सरासरी कमी आहे. बारामती व इंदापूर तालुक्यातील २९ गावे-वाड्या बाधित असून, तब्बल ६५ हजार नागरिक बाधित आहेत. सातारा जिल्ह्यातील माण व खटाव या कायम दुष्काळी भागातील गावांमधे देखील टँकर सुरु आहेत. त्यातही माण तालुक्यातील ७१ गावे व ५६७ वाड्या वस्त्यांवर ९७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येथील सव्वालाखाहून अधिक लोकसंख्या व ६५ हजार ५३९ पशूनधन बाधित आहे. 
सोलापूर जिल्ह्यातील तीनशे एक गावे व दीड हजारांहून अधिक वाड्यांमधे ३४६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येथील ६ लाख ९८ हजार ९४९ नागरिक आणि ३ लाख ६० हजार ४३६ पशूधन बाधित झाले आहे. पूरग्रस्त सांगली जिल्ह्यातील ७८ गावे व ६०३ वाड्यांवर ९० टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. पावणेदोन लाख नागरिकांना टँकरद्वारे पाणी देण्यात येत असून, २७ हजार ५४३ पशूधन बाधित झाले आहे.  
--
टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणाºया गावांची संख्या तालुकानिहाय       
पुणे जिल्हा             टँकर संख्या    गावे-वाड्या    बाधित लोकसंख्या
आंबेगाव                      १          १/७           ८३१
बारामती                     १५        १५/१४५        ३३,०४०
दौंड               ९        ७/५०        १५,५४१
इंदापूर               १४        १२/५८        ३२,८१९
पुरंदर              ११        ५/६४        १८,७५६
एकूण              ५०        ४०/३२४        १,००,९७८
-----
सातारा        
माण            ९७        ७१/५६७        १,३५,०४२
खटाव                   ३        ८/३९        ४,९११
फलटण                   २        ३/१८        ३,९८८
एकूण            १०२        ८२/६२४        १,४३,९४१
----
सोलापूर                 ३४६        ३०१/१५९६    ६,९८,९४९
सांगली                 ९०        ७८/६०३        १,८४,८८८

Web Title: Tanker water supply to eleven lakh citizens of Pune region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.